घरताज्या घडामोडीऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात

ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देश कोरोनाची लस विकसित करत आहे. रशियाने यापूर्वीच कोरोनावरील लसीला मंजुरी दिली आहे. तसेच भारतात देखील लसीची वैद्यकीय चाचणी सुरु आहे. दरम्यान, भारतात आजपासून ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला सुरुवात होणार आहे.

ऑक्सफर्डने भारतात कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. त्यानुसार कोविशिल्डच्या सुरक्षा आणि रोग प्रतिकारशक्तीची चाचणी करण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयेमध्ये निरोगी व्यक्तींवर नियंत्रित अभ्यास केला जाणार आहे. तसेच यापूर्वी काही माध्यमांमध्ये सिरम इन्स्टीट्यूटची ही लस ७३ दिवसांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, कंपनीने या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता यशस्वी चाचणी आणि नियामकाची मान्यता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

माकडांवर ही लस ठरली यशस्वी

‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार; माकडांवर करण्यात आलेल्या केलेल्या चाचणीत ही लस यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती तयार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जगभरातील अनेक देशांनी मिळून या ऑक्सफर्डची लस विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. तर दुसरीकडे युरोपियन युनियनमधील अनेक देशही करार करण्याच्या टप्प्यात आहे. युकेमध्ये ही लस अत्यल्प दरात मिळणार असल्याचंही ऑक्सफर्डने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

‘आम्हाला केंद्रीय नियामकाकडून आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही २५ ऑगस्टपासून पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयेमध्ये मानवी वैद्यकीय चाचणीला सुरूवात करणार आहोत’. – प्रकाश कुमार सिंग सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियामधील शासन व नियामक विषयांचे अतिरिक्त संचालक

- Advertisement -

हेही वाचा – केंद्राच्या ३००० कोटींच्या निधीतून ‘मिशन कोविड सुरक्षे’चा प्रस्ताव!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -