घरदेश-विदेशPIA : ‘शुक्रिया पाकिस्तान’ची चिठ्ठी लिहून कॅनडात बेपत्ता होतायत पीआयएच्या एअरहोस्टेस

PIA : ‘शुक्रिया पाकिस्तान’ची चिठ्ठी लिहून कॅनडात बेपत्ता होतायत पीआयएच्या एअरहोस्टेस

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची एक क्रू मेंबर बेपत्ता झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, एका फ्लाइटमध्ये ती ड्युटीवर होती, परंतु हे विमान कॅनडामध्ये उतरल्यापासून तिचा काही थांगपत्ता लागला नसल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, या वर्षातील ही दुसरी तर, वर्षभरातील नववी घटना आहे.

हेही वाचा – Pakistan Zindabad : राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान झिंदाबाद? खरं काय…

- Advertisement -

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार एअरहोस्टेस मरियम रझा इस्लामाबादहून पाकिस्तान एअरलाइन्सच्या (PIA) फ्लाइट PK-782मधून कॅनडाला रवाना झाली. पण जेव्हा विमान कॅनडाहून कराचीला परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा ड्युटीसाठी परतली नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी मरियम रझा हिचा शोध सुरू केला. त्यांची टीम संबंधित हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिथे तिची बॅग सापडली. बॅग उघडल्यावर आतमध्ये एअर होस्टेसचा ड्रेस आणि एक चिठ्ठी सापडली. ‘शु्क्रिया, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स,’ असे या चिठ्ठीत लिहिले होते. मरियम रझा ही सुमारे 15 वर्षांपासून पीआयए या सरकारी विमान कंपनीच्या सेवेत होती. तिला सध्या इस्लामाबादहून टोरंटोला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ड्युटी दिली होती.

- Advertisement -

पाकिस्तानमधून कॅनडामध्ये एअर होस्टेस बेपत्ता होण्याची ही दुसरी घटना आहे. एवढेच नाही तर, गेल्या वर्षभरातील ही नववी घटना आहे, असे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले. अशा वारंवार घडणाऱ्या प्रकरणांमुळे पाकिस्तान एअरलाइन्ससमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मरियम रझाने आता कॅनडामध्ये राहण्याचा विचार केला असावा. त्यामुळेच ती कॅनडामध्ये राहिली आणि पाकिस्तानी विमान कंपनीचे आभार मानत पत्र लिहून निघून गेली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Congress On BJP : मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी; काँग्रेसचा हल्लाबोल

मरियम रझा यांच्या आधीही पीआयएचे कर्मचारी अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. कॅनडाचे निर्वासित धोरण अतिशय सुलभ असल्याने असे होत असावे. कॅनडामध्ये प्रवेश करून कोणीही आश्रयासाठी अर्ज करू शकतो. अशा प्रकारे लोक कॅनडामध्ये राहू लागतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यातही असाच एक प्रकार समोर आला होता, जेव्हा परतीच्या विमानासाठी एक एअर होस्टेस ड्युटीसाठी परतली नाही. तर, गतवर्षी अशा 7 घटना घडल्या होत्या. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी एक क्रू मेंबर कॅनडामध्ये अशाच प्रकारे राहिला होता. आता तो कॅनडामध्ये स्थायिक झाला आहे आणि पाकिस्तान सोडून इथे कसे स्थायिक व्हायचे, याचा सल्ला तो इतर क्रू मेंबर्सना देतो. त्यामुळे अशा घटनांना कसा आळा घालता येईल, यावर आम्ही कॅनडाच्या प्रशासनाशी चर्चा करीत असल्याचे पाकिस्तान एअरलाइन्सने सांगितले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘जर-तर’ला काहीही अर्थ नसतो, अमित शाह का म्हणाले असं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -