PIB Fact Check: पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे दिलं जातंय कर्ज? जाणून घ्या सत्य

PIB Fact Check Is Telling Truth About PM Yojana Loan On Aadhaar Basis
PIB Fact Check: पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे दिलं जातंय कर्ज? जाणून घ्या सत्य

लोकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर कोणतेना कोणते मेसेज व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काहीच तथ्य नसते. अशा मेसेजद्वारे खोटी माहिती पसरवली जाते आणि अनेक वेळा लोकं या जाळ्यात अडकतात. त्यानंतर आपली खासगी माहिती आणि आर्थिक माहिती देतात. दरम्यान पीआयबी फॅक्ट एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे खोटे, फेक आणि संभ्रमित करणाऱ्या जाहिराती, सूचना आणि सोशल मीडियावर पोस्टमधील सत्य जनतेसमोर आणतात. सध्या पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे कर्ज दिले जाते आहे आणि ते पण फक्त २ टक्के व्याजावर. यामध्ये वार्षिक व्याजावर ५० टक्क्यांची सूट आहे. याच मेसेजमधील तथ्य आता पीआयबीने समोर आणले आहे.

पीआयबीने फॅक्टने काय सत्य सांगितले?

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटद्वारे या मेसेजमधील सत्य सांगितले आहे. पीआयबी फॅक्टने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे कर्ज देण्याचा मेसेज तुम्हालाही आला आहे का? तर हा मेसेज खोटा आहे. हा ठगीचा एक प्रयत्न असून असतो. असे मेसेज शेअर करू नका.’

अफवांपासून सावध राहा

पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून याबाबतची कोणतीही योजना नाहीये. सोशल मीडिया युजर्सनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहा.

अशा प्रकारे मेसेजपासून सावध राहा

पीआयबी फॅक्ट चेकनंतर हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले जात आहे. पीआयबीने सांगितले की, ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा प्रकारच्या मेसेजपासून लोकांनी सावध राहा.’

तुम्ही करू शकता फॅक्ट चेक

जर तुमच्याकडे अशाप्रकारचे मेसेज येत असतील, तर त्याबाबत सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेक करू शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ यावर व्हिजट करावे लागले. याशिवाय तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल [email protected] यावर खोटी बातमी किंवा लिंक किंवा व्हिडिओ पाठवू शकता.


हेही वाचा – महिलेने अंगावरील साडी काढून रोखला रेल्वे अपघात! नेमकं सत्य काय? जाणून घ्या