घरदेश-विदेशSBI च्या ग्राहकांनो पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले? जाणून घ्या सत्य

SBI च्या ग्राहकांनो पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले? जाणून घ्या सत्य

Subscribe

तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (SBI) च्या व्यवहाराशी संबंधित एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, बचत खात्यात तुम्ही वर्षाला 40 व्यवहार करू शकता. 40 पेक्षा जास्त व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारावर खात्यात जमा केलेल्या रकमेतून 57.5 रुपये कट केले जातील.

आणखी एका मेसेजमध्ये असेही सांगण्यात येत आहे की, एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास एकूण 173 रुपये कट केले जातील. मात्र पीआयबी फॅक्ट चेकवर सांगण्यात आले की, बँकेने असा कोणताही नियम केलेला नाही. हे सर्व दावे खोटे असल्याचे पीआयबीकडून सांगण्यात आले. बँकेने व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियम बदललेले नाहीत.

- Advertisement -

दर महिन्याला 5 वेळा मोफत काढू शकतो पैसे

तुमच्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतील, असे पीआयबी फॅक्टने अलीकडेच सांगितले होते. यानंतर व्यवहारासाठी किंवा कोणत्याही टॅक्ससाठी जास्तीत जास्त 21 रुपये स्वतंत्रपणे द्यावे लागतील. अलीकडेच पीआयबी फॅक्ट चेकने आणखी एका व्हायरल मेसेजला फेक म्हटले होते. या व्हायरल मेसेजमध्ये आधार कार्डधारकांना 4.78 लाख रुपयांचे कर्ज दिल्याचा दावा करण्यात आला होता.

काय आहे पीआयबीचा फॅक्ट चेक?

सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही बातम्या तुम्हाला संशयास्पद वाटत असतील, तर तुम्ही PIB द्वारे फॅक्ट चेक करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल . याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक 8799711259 किंवा ईमेल : [email protected] वर माहिती पाठवू शकता.


बहुजनांसाठी फडणवीसांनी केलेले काम कुणी झाकू शकत नाही; पडळकरांकडून कौतुकाचा वर्षाव


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -