Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग नरभक्षी दांपत्याचं भीषण कृत्य! रोज खायचे मानवी मांसापासून बनवलेलं लोणचं आणि बिस्किट

नरभक्षी दांपत्याचं भीषण कृत्य! रोज खायचे मानवी मांसापासून बनवलेलं लोणचं आणि बिस्किट

Related Story

- Advertisement -

आपल्या जेवणात लोणचं आणि नाश्त्याला बिस्किटं असणं हे नित्याचे आहे. लोणचाशिवाय तर जेवणाचे ताटच अपूर्ण असल्यासारखे वाटते. मात्र हेच लोणचं आणि बिस्किट्स जर मानवाच्या मांसापासून बनवलेले असले तर. ऐकून धक्का बसला ना. परंतू जगाच्या पाठीवर असे एक जोडपे आहे जे चक्क मानवाच्या मांसापासून लोणचं आणि बिस्टिक बनवतंही होते आणि खातही होते. यासाठी त्यांनी तब्बल ३० लोकांना आपले भक्ष केले आहे. २०१७ साली ही धक्कादायक घटना समोर आली. रशियामध्ये राहणाऱ्या या दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटक करताना या जोडप्यावर एक वेट्रेससह आणखी एका इसमाला मारण्याचा तसेच त्याचे मांस खाण्याचा आरोप लावण्यात आला होते. मात्र अटकेनंतर त्यांच्या सर्व क्रूरकृत्याचा उलगडा झाला. जो ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला.

रशियातील नरभक्षक दाम्पत्य

काय आहे घटना

- Advertisement -

रशियातील क्रासनोदर शहरात पोलिसांना गस्त घालताना एक मोबाईल फोन हाती लागला. हा फोन तपासल्यानंतर पोलिसांना त्यात धक्कादायक फोटोज पाहायला मिळाले. यात एक माणूस मानवी शरीरासोबत सेल्फी काढत असल्याचे ते चित्र होते. त्यानंतर पोलिसांनी सेल्फी घेतलेल्या माणसाला शोध घेतला. चौकशीदरम्यान पोलिसांनी दिमित्री बाकेशेव आणि त्याची पत्नी नतालिया यांना क्रासनोदर शहरातून अटक केली. पोलिसांनी हिसका दिल्यानंतर या जोडप्याने त्यांचे कृत्य कबूल करत आतापर्यंत ३० लोकांना आपले भक्ष बनवल्याचे सांगितले. या दोघांनी ३० जणांना मारून त्यांच्या मांसापासून लोणचं बनवून ते रेस्टोरंटमध्ये विकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. या जोडप्याच्या घराची झडती घेतल्यानंतर तिथे पोलिसांना आठ जणांच्या शरीराचे अवयव हाती लागले. तसेच १९ जणांची कातडेदेखील पोलिसांच्या हाती लागली.  या घटनेने शहरात खळबळ माजवली.

दाम्पत्याच्या घरामध्ये तळघर होते. जिथे ते लोकांची शिकार करून त्यांच्या शरिराचे तुकडे ठेवत होते. त्या तुकड्यासोबत सेल्फीदेखील काढत होते. नरभक्षक जोडप्याला अटक झाली असून त्यांना १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा –

- Advertisement -

हौसेसाठी या महाशयांनी शरीरावर केल्या ५१६ सर्जरी, पाहा कसा झालाय चेहरा!

- Advertisement -