अमेरिकेत विमान क्रॅश करण्याची धमकी देणारा वैमानिक पोलिसांच्या ताब्यात

अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये विमानाच्या वैमानिकाने विमान धडकवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. वैमानिकाने 9 आसनी विमानाचे अपहरण केले असून तुपेलो विमानतळावरून उड्डाण केले.

अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये विमानाच्या वैमानिकाने विमान धडकवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. वैमानिकाने 9 आसनी विमानाचे अपहरण केले असून तुपेलो विमानतळावरून उड्डाण केले. यानंतर तासभर तो शहरातच विमान उडवत होता. या संदर्भात माहिती मिळताच पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. (pilot threatened to crash at Walmart store in Mississippi us police)

अमेरिकेत विमान अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्याने धमकी दिली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरातील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अनेक दुकाने रिकामी करण्यात आली. स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजता ही घटना घडली. वॉलमार्ट स्टोरला धडक देऊन विमान क्रॅश करू अशी धमकी त्या वैमानिकाने दिली होती. पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तुपेलो पोलिस विभागाकडून सर्व नागरिकांनी सजग आणि जागरूक राहण्याचे आवाहन करण्यता आले आहे.


हेही वाचा – लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 दिवसांत 1.50 कोटींचं दान