Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मालकिणीची हत्या केल्यानंतर पिटबुल 14 दिवस ताब्यात

मालकिणीची हत्या केल्यानंतर पिटबुल 14 दिवस ताब्यात

Subscribe

ब्राउनी नावाच्या या पिटबुल कुत्र्याला गेल्या २४ तासांपासून ताब्यात घेण्यात आलं आहे. लखनऊ नगर निगमच्या एका कारागृहात पिटबुल सध्या एका कोपऱ्यात बंदिस्त आहे

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे ईमानदारी विसरलेल्या पिटबुल कुत्र्याने आपल्याच मालकिनीची हत्या केली आहे. या कुत्र्याला आता ताब्यात घेऊन २४ तास पू्र्ण झाले आहेत. लखनऊ नगर येथील प्राण्यांच्या डॉक्टरांच्या मते, गेल्या २४ तासामध्ये पिटबुलचं वागणं सामान्य आहे. तसेच या दरम्यान असं वाटतं होतं की पिटबुल कुत्रा घाबरलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्याच ८२ वर्षीय मालकिनीची हत्या करणाऱ्या पिटबुल कुत्र्याला १४ दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

खरंतर, ब्राउनी नावाच्या या पिटबुल कुत्र्याला गेल्या २४ तासांपासून ताब्यात घेण्यात आलं आहे. लखनऊ नगर निगमच्या एका कारागृहात पिटबुल सध्या एका कोपऱ्यात बंदिस्त आहे. यावेळी प्राण्यांच्या डॉक्टरांनी पिटबुलची तपासणी केली तसेच त्याची वागणूक पाहिली. आता पुढील १४ दिवस पिटबुलच्या सर्व हालचालींवर डॉक्टरांचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

पशु कल्याण अधिकाऱ्यांच्या मते, पुढील १४ दिवस र पिटबुलचा व्यवहार ठीक असेल तर या पिटबुलला कोणी घेऊन जाणार असेल तर दिले जाईल. मात्र त्याचा व्यव्हार ठिक नसेल तर त्याला इथेच ठेवले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, पिटबुलला आपल्या घरी ठेवण्यासाठी अमित त्रिपाठी यांच्याकडे लायसन होते. त्यामुळेच अमित त्रिपाठीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, मात्र जाणकारांच्या मते, आक्रमक कुत्रे घरात पळू नये.तसेच याबाबत डॉ. अभिनव वर्मा यांनी सांगितले आहे की, माणसांनी केवळ त्याच कुत्र्यांना घरामध्ये पाळायला हवं, जे आक्रमक नसतील. पिटबुल मिक्स जातीचा कुत्रा आहे. जो खूप आक्रमक आहे.

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -