देशातील ‘या’ शहरांमध्ये पिटबुल आणि रॉटवेलरवर बंदी

ज्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची नोंदणी केली नाही त्यांना 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. अनेक शहरांमधून एकामागून एक अश्या घटना समोर आल्या आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढत असताना पंचकुला महानगरपालिकेने पिटबुल आणि रॉटवेलर कुत्र्यांच्या या दोन प्रजातींवर बंदी घातली आहे. आता या दोन जातींचे कुत्रे घरात पाळता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पंचकुलाचे महापौर कुलभूषण गोयल यांनी सांगितले की, एमसी हाऊसमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, जो तात्काळ लागूही करण्यात आला आहे.

या बैठकीत 24 कलमी अजेंडा मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच संदर्भांत महापौर कुलभूषण गोयल म्हणाले, ही बाब कुत्र्यांशी निगडीत आहे. ज्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची नोंदणी केली नाही त्यांना 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ते म्हणाले की कुत्र्यांचे विशेषत: पिटबुल आणि रॉटवेलर जातीच्या घटना अनेक ठिकाणी नोंदवले गेले आहेत नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. पंचकुला व्यतिरिक्त इतर अनेक शहरांमध्ये पिटबुल आणि रॉटवेलर जातीच्या कुत्र्यांनाही बंदी घालण्यात आलेली आहे.

पिटबुल कुत्र्यांनी हल्ले केलेलया घटनांवरून देशभरातच संतापाची ताल उसळली आहे. देशातील अनेक शहरांमधून एकामागून एक अश्या घटना समोर आल्या आहेत. मेरठमध्ये पिटबुलच्या हल्ल्यात एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी पंजाबमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा कुत्र्याने चावा घेतला. गुरुग्राममध्येही एका महिलेवर पिटबुलने हल्ला केला, तर लखनऊमध्ये पिटबुलने आपल्याच मालकिणीवर हल्ला केला. तर गाझियाबादमध्ये अशीच घटना घडल्याने त्या मुलाला 100 हून अधिक टाके पडले होते. देशातील कुत्र्यांचे माणसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर PETA इंडिया (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स) ने देखील पशुसंवर्धन मंत्रालय आणि राज्य सरकारला पत्र लिहून पिटबुल्ससारख्या जातींच्या श्वानांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.


अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीच्या 100 पदांसाठी अडीच लाख महिलांचा अर्ज, ऑक्टोबरपासून सुरु होणार रॅली