घरट्रेंडिंगभारतीय थाळी खाण्यात पाकिस्तान आणि इस्राईल पुढे

भारतीय थाळी खाण्यात पाकिस्तान आणि इस्राईल पुढे

Subscribe

भारतीय पदार्थांपेक्षा आपल्याकडे पिझ्झा, बर्गरलाच जास्त प्राधान्य दिले जाते. जगभरात १०० देशातील लोक हे पिझ्झा ऑर्डर करतात असे गुगल सर्चच्या एका यादीतून समोर आले आहे.

आपल्याला भूक लागली की आपल्याला काही तरी चटपटीत खायला हवे असते. घरातल्या जेवणापासून ब्रेक हवा असला की बाहेरुन पिझ्झा, बर्गर, चायनीज असे पदार्थ आपण हमखास मागवतो. भारतीय पदार्थांपेक्षा आपल्याकडे पिझ्झा, बर्गरलाच जास्त प्राधान्य दिले जाते. जगभरात १०० देशातील लोक हे पिझ्झा ऑर्डर करतात असे गुगल सर्चच्या एका यादीतून समोर आले आहे. यात भारतीय लोकांपेक्षा पाकिस्तानी आणि इस्राईल देश भारतीय पदार्थ खाण्यात सर्वात पुढे आहेत. पाहूयात कोणत्या देशातील लोकांना कोणते पदार्थ खायला आवडतात.

भारतीयांना आवडतात इटालीन पदार्थ

२०२० वर्षात भारतीय लोकांनी सर्वात जास्त पिझ्झा खाण्याला पसंती दर्शवली आहे. भारतीयांना इटालीयन पदार्थ खाण्यास भरपूर आवडतात. याशिवाय यूएई, फ्रान्स, जर्मनी , स्विझर्लंड, पोलंड, इंडोनेशिया, इटलीत लोकांनाही असे पदार्थ खायला आवडतात.

- Advertisement -

अमेरिकेला आवडतात चायनीज पदार्थ

दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिकेतील लोकांना चायनीज पदार्थ खायला जास्त आवडतात. अमेरिका आणि चीनमध्येचे संबंध जरी चांगले नसले तरी अमेरिकेतील लोकांना चायनीज खायला जास्त आवडते. आयरलॅंड, हंरगी, ग्रीस येथील लोकांनाही चायनीज पदार्थ खायला आवडतात.

जपानी लोकांना सुशी खाणे प्रिय

जगभरात तिसऱ्या क्रमांकावर जो पदार्थ आहे तो म्हणजे जपानी सुशी. सुशी हा पदार्थ जगभरातील दहाहून अधिक देशात आवडीने खाल्ला जातो. जापान, ब्राजील, यूक्रेन, स्वीडन यारसारख्या देशात सुशी खूप लोकप्रिय आहे. सुशीमध्ये शिजवलेला भात आणि सी फूडचा समावेश असतो. जपानी लोक सुशी जेवण म्हणून खातात.

- Advertisement -

पाकिस्तानी लोकांना आवडतात भारतीय पदार्थ

देशभरात चौथ्या क्रमांकावर भारतीय पदार्थ आहेत. पाकिस्तानमध्ये भारतीय पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. २०२०मध्ये भारतीय लोकांनी पिझ्झा खाण्याला पसंती दिली मात्र पाकिस्तानी लोक भारतीय पदार्थांना आपली पसंती दर्शवली आहे. पाकिस्तानसोबतच इस्राइल, नेदरलॅंड या देशातही भारतीय पद्धतीच्या जेवणाला सर्वात जास्त पसंती दिली जात आहे.

पिझ्झा खाण्याला लोकांची सर्वात जास्त पसंती का दिली जात आहे यावर एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, पिझ्झामध्ये अनेक टॉपिंग्स असतात. त्याशिवाय आपण त्यावर आपल्या आवडत्या पदार्थांचे टॉपिंगही लावू शकतो त्यामुळे भारतीय लोकांनी पिझ्झा खाण्याला सर्वात जास्त पसंती दिली आहे. खरंतर पिझ्झा हा पदार्थ इटलीत तयार केला जातो. पिझ्झा हे तिथले खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देशाची जी खाद्य संस्कृती आहे मात्र भारत भारतीय पदार्थसोडून पिझ्झा खाण्याला पसंती देत आहे.


हेही वाचा – गर्लफ्रेंडबरोबर पती घेत होता डोश्याचा स्वाद अन् बायकोने दिला दणकून प्रसाद!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -