कोलंबियात टेकऑफदरम्यान विमानाचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

other small plane crashes incentral colombian city of medelline 8 dead

कोलंबियातील मेडेलिन शहरात सोमवारी भीषण विमान अपघाताची घटना घडली आहे. यात विमानातील जणांचा मृत्यू झाला आहे. टेकऑफदरम्यान अचानक विमान खाली कोसळले आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या अपघातात मृतांव्यतिरिक्त कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

कोलंबियाच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, ओलाया हेरेरा विमानतळावरून अपघातग्रस्त विमानाने उड्डाण केले होते, मात्र हे विमान लाँडिंगदम्यान अचानक खाली कोसळले. या अपघातात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. विमानात अपघातग्रस्त आठहून अधिक लोक होते की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. यासोबतच अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टेकऑफदरम्यान कोसळले विमान

मेडेलिनचे महापौर डॅनियल क्विंटेरो यांनी एका निवेदन जारी करत सांगितले की, टेकऑफच्यावेळी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हा अपघात झाला. दुर्दैवाने पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान रनवेजवळ कोसळले, क्विंटेरो म्हणाले की, या दुर्घटनेत सात घरं उद्ध्वस्त झाली असून इतर सहा इमारतींचे नुकसान झाले आहे.या घटनेनंतर लगेचच अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. हे विमान चोकोच्या पश्चिम विभागाच्या दिशेने जात होते.

याच्या एक महिन्यापूर्वी कोलंबियामध्ये भीषण बस अपघात झाला होता, ज्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच इतर 14 जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने हा अपघात झाला होता.


चीनच्या हेनान प्रांतातील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी; 36 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी