घरदेश-विदेशप्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांची वाढली चिंता! मृत्यूच्या प्रमाणातही वाढ

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांची वाढली चिंता! मृत्यूच्या प्रमाणातही वाढ

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोना बाधित रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जात होती. मात्र कोरोना बाधित रुग्णासाठी प्लाझ्मा थेरपी किती प्रभावी आहे? याबाबत अजूनही वादविवाद सुरू आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. या अभ्यासामध्ये असे म्हटले की, प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना संक्रमित रुग्णाला मदत झाली नाही, तर उलट त्याचे गंभीर प्रतिकूल घटना किंवा धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहेत. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णाला कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा दिला जातो. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान, ऑक्सिजन, बेड तसेच प्लाझ्माची मागणी वाढली होती. पण आता या कॅनेडियन अभ्यासाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

‘रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी’ नावाच्या अभ्यासात ९४० रुग्णांचा समावेश करण्यात आला. ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्लाझ्मा थेरपी घेतलेल्या एकूण रुग्णांपैकी ३३.४ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची पातळी कमी होणे, श्वास घेण्यास अडचण होणे यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले होते अशावेळी, ज्यांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली नाही त्यांच्यापैकी २६.४ टक्के लोकांना अशी समस्या होती. नेचर जर्नलने सादर केलेल्या ३० दिवसांच्या अभ्यासाच्या शेवटी असे आढळून आले की, ज्यांनी प्लाझ्मा थेरपी घेतली होती त्यांच्या मृत्यूचा दर जास्त होता. तर यादरम्यान, ज्या गटात प्लाझ्मा थेरपी दिली गेली नाही त्यांच्या मृत्यूची संख्या २०.५ टक्के इतकी होती. या अभ्यासानुसार, जवळजवळ सर्व रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर ८ दिवसांनी प्लाझ्मा थेरपी देण्यात आली होती.

- Advertisement -

देशातील विविध रुग्णालयांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान प्लाझ्मा थेरपी दिली. परंतु या थेरपीच्या वाद-विवादानंतर, अनेक रुग्णालयांनी दुसऱ्या लाटेत प्लाझ्माचा वापर केला नाही. आयसीएमआरने गेल्या वर्षी प्लाझ्मा थेरपीवर अभ्यास केला होता. यावेळी असे आढळून आले की, प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना होणाऱ्या रूग्णांच्या मृत्यूंमध्ये कोणतीही घट होत नाही. हा अभ्यास ३९ शहरांमधील ४०० कोरोना रुग्णांवर करण्यात आला होता.


Corona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात स्वदेशी लसीला WHO कडून मिळणार मंजूरी
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -