घरCORONA UPDATEकोरोनाबाधितांवर Plasma Therapy निष्क्रिय, ICMR हटवणार ही उपचारपद्धत

कोरोनाबाधितांवर Plasma Therapy निष्क्रिय, ICMR हटवणार ही उपचारपद्धत

Subscribe

देशात कोरोना विषाणू झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या कोटीचा पार गेली आहे. यात रुग्णांचे नातेवाईक रुग्ण लवकर रिकव्हर व्हावा यासाठी प्लाझ्मा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्लाझ्मा डोनेशनचे आवाहन करण्यात येत असून मदत मागितली जात आहे. परंतु देशात कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी निष्क्रिय ठरत असल्याचे मत अनेक आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा कोरोना उपचार पद्धतीतून प्लाझ्मा थेरपी हटवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्लाझ्मा थेरेपीसंदर्भात झाली बैठक

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (ICMR) कोरोना रुग्णांवर वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात टास्क फोर्सची चर्चा झाली. यावेळी टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टरांनी कोरोनाच्या उपचार पद्धतीत प्लाझ्मा थेरपी निष्क्रिय असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ही उपचाप पद्धती उपचारांच्या यादीतून काढून टाकली पाहिजे. असे मत व्यक्त केले. तसेच बर्‍याच सदस्यांनी सांगितले की, या थेरपीचा अयोग्य वापर होत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले. त्यामुळे आयसीएमआर ICMR लवकरच यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.

- Advertisement -

डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी लिहिले केंद्राला पत्र 

अशा वेळी उपचारांच्या यादीतून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याची चर्चा आहे. जेव्हा देशाच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना देशातील काही आघाडीचे वैज्ञानिक, डॉक्टर, आणि व्हायरस एक्सपर्टसनी पत्र लिहिले आहे. या पत्रात सार्वजनिक रोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लिहिले की, कोवॅलेसेंट प्लाझ्माचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत आहे. कोरोनाविरोधात जी प्लाझ्मा थेरेपी वापरली जात आहे. ती ICMR च्या गाईडलाइन्सविरोधात आहे. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील ज्येष्ठ तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, कोरोनावरील उपचारांसाठी वापरली जाणारी प्लाझ्मा थेरपी अस्तित्वात असलेल्या आरोग्य पद्धतीत नाही.

सध्या प्लाझ्मा थेरपीला परवानगी आहे

सध्याच्या कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराच्या पद्धतींनुसार, रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर करू शकतो. यासाठी कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो.

- Advertisement -

Vaccination: आता आधार कार्ड शिवाय घेता येणार लस, UIDAIचे स्पष्टीकरण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -