Corona: प्लाझ्मा थेरेपीवर संशोधन सुरू; अद्याप चाचणीसाठी परवानगी नाही

कोरोना व्हायरसवर उपचार पद्धती आणण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग देशात केला जाणार असून अद्याप याच्या प्रयोगाला परवानगी दिली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोना व्हायरसवर उपचार पद्धती आणण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग देशात केला जाणार असल्याची माहिती काही दिवसांपासून येत आहे. मात्र अद्याप या प्रयोगाला परवानगी दिली नसून त्यावर सखोल संशोधन सुरू असल्याचे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगतले. प्लाझ्मा थेरेपी यशस्वी न झाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रयोग करण्यापूर्वी सर्व प्रकारची खातरजमा करणे गरजेचे असल्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच हा १०० टक्के यशस्वी होईल असा दावा करणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग काही काळासाठी लांबवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयसीएमआरकडून अद्याप मान्यता नाही 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्लाझ्मा थेरेपीला अद्याप भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ने मान्यता दिली नसून आयसीएमआर फक्त त्यावरील ट्रायल आणि संशोधनाला परवानगी दिली आहे. प्लाझ्मा थेरेपी पूर्णपणे यशस्वी उपचार करते, असे कोणतेही पुरावे किवा उदाहरण समोर आलेले नाही, त्यामुळे यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच अमेरिकेतही याकडे प्रयोगाच्या स्वरुपातच पाहिले जात आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

हेही वााचा – PMC बँकेचा वाली कोण? YES आणि PMC मध्ये भेदभाव का?

काय आहे प्लाज्मा थेरपी?

यात अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाज्मा थेरपी तसेच अँटीबॉडी थेरपी म्हटले जाते. ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात.
अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो.