घरदेश-विदेशमोदींचे पर्यावरणपूरक जॅकेट; संसदेत वेधले सर्वांचेच लक्ष

मोदींचे पर्यावरणपूरक जॅकेट; संसदेत वेधले सर्वांचेच लक्ष

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पेहरावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते परिधान करत असलेले जॅकेट हे मोदी जॅकेट म्हणून ओळखले जाते. विविध रंगाचे हे जॅकेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळेच खास त्यांच्यासाठी प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया केलेले जॅकेट भेट देण्यात आले. हे जॅकेट परिधान करुन पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.

 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्लास्टिकच्या बॉटलने बनवलेले खास जॅकेट परिधान करुन बुधवारी संसदेत पोहोचले. सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे हे जॅकेट होते. निळ्या रंगाचे हे जॅकेट प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया करुन तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

बंगळूरु येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इंडिया एनर्जी सप्ताहचे आयोजन केले होते. सोमवारी ६ फेब्रुवारीला या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले होते. तेथे पंतप्रधान मोदी यांना हे जॅकेट भेट देण्यात आले होते. हे जॅकेट खास प्लास्टिकच्या बॉटलवर पुर्नप्रक्रिया करुन तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारे दहा कोटी प्लास्टिक बॉटलवर पुर्नप्रक्रिया करण्याचे इंडियन ऑईल कंपनीचे लक्ष आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हेच जॅकेट दिले जाते. पंतप्रधान मोदी यांच्या या जॅकेटने संसदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पेहरावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते परिधान करत असलेले जॅकेट हे मोदी जॅकेट म्हणून ओळखले जाते. विविध रंगाचे हे जॅकेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांना प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया केलेले जॅकेट भेट देण्यात आले. हे जॅकेट परिधान करुन पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे येत्या १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मागच्या वेळेप्रमाणेच ते यावेळीही मुंबईच्या विविध भागांना ते भेटी देणार आहेत. महिन्याभरात दुसऱ्यांदा ते मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आगामी पालिका निवणडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईला लक्ष्य केंद्रीत केले असल्याने मोदींनी मुंबईला महत्त्व दिले आहे, असे बोलले जात आहे.

अंधेरी पूर्व येथे दाऊदी बोहरा समाजाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी ते येथे येणार आहेत. यावेळी बोहरा समाजाचे सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्यासोबत मोदी एकाच व्यासपीठावर येतील. तसेच मोदी मुंबईतील कुलाबा येथील भारतीय नौदल तळालाही भेट देणार आहेत. तर, मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -