घरCORONA UPDATEतर लसींवरही परिणाम होऊ शकतो, पूनावालांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका

तर लसींवरही परिणाम होऊ शकतो, पूनावालांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका

Subscribe

भीतीपोटी पूनावाला परदेशात गेले असतील तर ही सुरक्षा अपुरी

देशात कोविशिल्ड ही लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचासह त्यांचा कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेत लस पुरवठ्यावरून पूनावाला यांना धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबईतील अॅड. दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली आहे. देशात पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड या लसीची निर्मिती सुरु आहे. या गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा, किंमत आणि पुरवठ्यावरून देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळातच पूनावाला यांनी धमक्या मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पूनवाला यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री, देशातील बडे उद्योगपतींकडून जीवे मारण्याचा धमक्या येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे खरे बोललो तर शीर कापले जाईल अशी धमक्या मिळत असल्याने पूनावाला यांनी चिंता व्यक्त केली आहे. पूनावाला यांचा गौप्यस्फोटामुळे आता देशातील लसीकरण मोहिम बंद पडणार की काय अशी भीतीही व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याच संपूर्ण घटनेची गांभीर्यता लक्षात घेत वकील माने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. लस निर्मिती करणारा कंपनी मालकचं जर असुरक्षित असेल तर लस निर्मितीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यात अदर पूनावाला मरणाचा भीतीने भारत सोडून जात असतील तर ही अधिक चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीत कंपनीची अवस्था कॅप्टनविना वादळात अडकलेल्या जहाजाप्रमाणे होईल. त्यामुळे जगातील सर्वाच लसनिर्मिती कंपन्यांना व तिच्या मालकांना संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे माने यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

दरम्यान पूनावाला यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे देशात लसीकरण रखडल्यास आणि कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात न आल्यास भारतात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण होईल. दरम्यान पूनावाला यांनी सध्या ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे. मात्र, असे असतानाही भीतीपोटी ते परदेशात गेले असतील तर ही सुरक्षा अपुरी आहे, असा मुद्दाही त्यांनी याचिकेत स्पष्ट केला आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -