Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील ‘चांद्रयान-3’ (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत (India) हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘चांद्रयान-3’ चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला. एवढेच नाही तर जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russian President) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी ‘कृपया माझे अभिनंदन स्वीकारा’, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पाठवला आहे. (Please accept my congratulations The President of Russia also sent a greeting message to the Prime Minister and the President)
हेही वाचा – Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल
व्लादिमीर पुतिन यांनी भारताला पाठवलेल्या अभिनंदन संदेशात म्हटले की, “भारतीय अंतराळ केंद्र ‘चांद्रयान-3’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग केल्याबद्दल कृपया माझे मनःपूर्वक अभिनंदन स्वीकारा. अंतराळ संशोधनातील हे एक मोठे पाऊल आहे आणि भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रभावी प्रगतीचा निश्चितच पुरावा आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांना नवीन कामगिरीसाठी माझे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा द्या, असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांच्या हवाल्याने हा संदेश क्रेमलिनने जारी केला आहे.
#Chandrayaan3 | Russian President Vladimir Putin sends a congratulatory message to President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi congratulating India on the successful Moon landing of the Chandrayaan-3 mission, “Please, accept my heartfelt congratulations on the… pic.twitter.com/H3M7XE5rr4
— ANI (@ANI) August 23, 2023
अमेरिका आणि युरोपनेही केले अभिनंदन
अमेरिका आणि युरोपच्या अवकाश संस्थांनीही भारताचे अभिनंदन केले आहे. यूएस स्पेस एजन्सी नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी ट्वीट करत म्हटेल की, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’ चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन! चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश ठरल्याबद्दल भारताचं अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ एश्बॅकर यांनी ट्वीट करत म्हटले की, “अविश्वसनीय! इस्रो आणि भारतातील सर्व जनतेचे अभिनंदन!! नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून भारताने दुसऱ्या खगोलीय ध्रुवावर पहिले सॉफ्ट लँडिंग केल्यामुळे मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे.
हेही वाचा – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनविरोधात बंड करणाऱ्या वॅगनर प्रमुखाचा विमान अपघातात मृत्यू
जगभरातील नेत्यांनी मोदींना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या हे ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी (23 ऑगस्ट) ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान मोदी हे आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना भेटून ‘चांद्रयान-3’ मिशनच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा देतना अभिनंदन केले. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही सहभाग होता.