‘हर घर तिरंगा’ अभियान भारताला नव्या उंचीवर नेईल, मोदींकडून जनतेच्या उत्साहाचं कौतुक

MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हर घर तिरंगा अभियानात जनतेच्या उत्साहपूर्ण सहभागाची प्रशंसा केली. ही भावना देशाच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आज एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणांशी संवाद साधला आणि त्यांना तिरंगा दिला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले –

हर घर तिरंगा अभियानात दिसणारा देशवासीयांच्या उत्साह आणि प्रतिसाद देशाच्या एकता अखंडतेचे प्रतीक आहे. ही भावना अमृतकाळात देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. तिरंग्याशी प्रत्येक भारतीयाचे खास नाते आहे. आज माझ्या तरुण मित्रांना तिरंगा दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य सर्व काही सांगून जाते!