घरताज्या घडामोडीकोरोनाने आपल्यापासून अनेक हिरावले, नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू

कोरोनाने आपल्यापासून अनेक हिरावले, नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाविरोधी लढाईत आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांचा आज शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. काशीमधील सेवक म्हणून मला वाराणसी येथील प्रत्येकाचे धन्यवाद मानायचे आहेत. विशषतः डॉक्टर्स, नर्स, टेक्निशिअन्स, वॉर्ड बॉय आणि एम्ब्युलन्स ड्रायव्हर्स ज्यांनी कोरोनाविरोधी लढाईत अतिशय मोठे काम केले आहे. हे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तुमच्या इतक्या परिश्रमानंतरही आपण अनेक आपले नातेवाईक वाचवू शकलो नाही, या व्हायरसने अनेकांना आपल्यापासून दुरावले आहे. त्या सर्व लोकांना विनम्र श्रद्धांजली आणि सांत्वन पंतप्रधानांनी व्यक्त केले. ही श्रद्धांजली देताना पंतप्रधान काही वेळासाठी थांबले, त्यांचे डोळे यावेळी पाणावले. पंतप्रधान हे आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशी बोलत होते. कोरोना आणि इतर हॉस्पिटलच्या कामगिरीबाबतही त्यांनी आढावा घेतला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढच्या काळात म्युकरमायकोसिसचे आव्हान असणार आहे, याबाबतही अलर्ट केले. या सगळ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोनाविरोधी लढाईतील योगदान सांगताना आणि त्यांचे कौतुक करताना मोदींचे डोळे पाणावले.

आजच्या वाराणसीतील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतले गेलेले प्रयत्न तसेच नव्या आव्हानांच्या तयारीचे त्यांनी कौतुक केले. वाराणसीने पंडित राजन मिश्रा कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या तयारीचेही त्यांनी कौतुक केले. वाराणसीने या हॉस्पिटल्या माध्यमातून एक चांगले उदाहरण ठेवले असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्यामध्ये ऑक्सिजन आणि ICU बेड्सच्या निमित्ताने अल्पावधीतच झालेले नियोजन याबाबतची त्यांनी कौतुक केले. ज्या वेगाने ही सर्व यंत्रणा उभी राहिली त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संपुर्ण नियोजनाचे कौतुक केले. आपण आतापर्यंत कोरोनाला खूपच उत्तम पद्धतीने रोखून ठेवले आहे, पण ही विश्रांतीची वेळ नव्हे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आशा आणि परिचारिकांनी ग्रामीण भागात केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात लसीकरणाच्या मोहीमेत सहभाही होऊन आपल्याला जबाबदारी पार पाडायची आहे, असेही पंतप्रधानांनी आवाहन केले. आपण बाबा विश्वनाथ काशीच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील लढाई जिंकूच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

सध्या देशात कोरोना पाठोपाठच नवीन आव्हान उभे राहिले आहे, ते म्हणजे ब्लॅक फंगसचे (Black fungus) चे आव्हान. त्यामुळेच देशात कोरोना रूग्णांमध्ये वाढणाऱ्या या आजाराविरोधात आपली लढाई महत्वाची आहे. कोरोनावर उपचार घेतलेल्या रूग्णांमध्ये हा आजार आढळत आहे. त्यामुळेच अशा आजारांवर नियंत्रणासाठी देशात कोरोनाविरोधी लस घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना दिसत नसलेला शत्रू असून हा शत्रू वेगवेगळ्या मार्गाने युद्ध पुकारत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -