घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास ब्रिटनचा नकार, पीएम बोरिस जॉन्सन म्हणाले...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास ब्रिटनचा नकार, पीएम बोरिस जॉन्सन म्हणाले…

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध पेटले आहे. युक्रेनला अनेक देशांना पाठिंबा दिला आहे. युक्रेनचा युरोपियन देशांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु ब्रिटनने युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला असून आम्ही रशियाच्या सैन्यांशी लढणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय.

बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांनी सांगितलं होतं की, देश लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यावर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी थेट निर्बंध घालणार आहे. जॉन्सन यांनी युक्रेनियन नागरिकांच्या नातेवाईकांना यूके व्हिसा देऊ केला आहे. रशियन सैन्यांच्या आक्रमणानंतर देश सोडून जाणारे युक्रेनियन लोक ब्रिटेनमध्ये येऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्यांचे कुटुंबीय आधीच ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत, असे जॉन्सन यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

जॉन्सन म्हणाले की, युक्रेनमधील संकटामुळे सध्याच्या घडीला ब्रिटन पाठ फिरवणार नाही. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सर्व काही धोक्यात घालणाऱ्या युक्रेनियन लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व शक्य आर्थिक आणि लष्करी सहाय्य देत आहोत. जॉन्सन युरोपियन सुरक्षा आणि स्थैर्याबाबत चर्चा करण्यासाठी एस्टोनियन पंतप्रधान काजा कैलास आणि एस्टोनियन अध्यक्ष अलार करिस यांचीही भेट घेणार आहेत.

रशिया आणि युक्रेन वाद शिगेला पोहोचला असताना युरोपियन युनियनच्या संसदेने युक्रेनचा अर्ज मंजूर केला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी सोमवारी २७ सदस्यीय युरोपीय संघमध्ये युक्रेनला सदस्य बनवण्यासाठी अर्ज केला होता. हाच अर्ज आता युरोपियन युनियनने स्वीकारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरूवारपासून सुरुवात, विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -