Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पंतप्रधान 'द केरळ स्टोरी'बद्दल भाष्य करतात आणि तिकडे मणिपूर...; ओवेसींचा नरेंद्र मोदींवर...

पंतप्रधान ‘द केरळ स्टोरी’बद्दल भाष्य करतात आणि तिकडे मणिपूर…; ओवेसींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला (Karnataka Assembly Elections) अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा (The Kerala Story) उल्लेख केला होता आणि विरोधी काँग्रेस (Congress) पक्षावर जोरदार हल्ला चढवला. यावरून एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान त्या वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत, तिकडे मणिपूर जळत आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासह बडे नेते प्रचार उतरले आहेत, तर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीसह (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाशासीत राज्यांचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारात बजरंग दल, जय बजरंगबली, जय भवानी जय शिवाजी आणि शिवाजी महाराज की जय हे मुद्दे चर्चेचा विषय ठरत असताना नरेंद्र मोदी यांनी एका दिवसापूर्वी कर्नाटकातील बेल्लारी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ‘द केरळ स्टोरी’चा उल्लेख करताना विरोधी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता.

- Advertisement -

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून उत्तर येईलच, पण त्याआधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटका निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला, त्यात पाच जवानांना वीरमरण आले. मणिपुरमध्ये हिंसाचाराची घटना घडली असून गाव, चर्च जळत आहेत. परंतु पंतप्रधान वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत आणि कर्नाटक निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आमचा बुर्का दाखवून पैसे कमवण्याचा प्रयत्न
पंतप्रधान चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत आणि पाकिस्तान आपल्या जवानांना मारत आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कथा खोटी आहे. आमचा बुर्का दाखवून पैसे कमवण्याचा प्रयत्न आहे आणि पंतप्रधान द्वेष पसरवत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांची पातळी घसरली आहे. त्यांना आम्हाला कोणती शिक्षा द्यायची आहे. केवळ चित्रपटाबद्दल भाष्य न करता आपल्या जवानांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला थांबवा,” असे आवाहन ओवेसी यांनी मोदींना केले आहे.

- Advertisement -

काँग्रेस ‘दहशतवादी प्रवृत्ती’च्या पाठीशी
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेस, डावे पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी विरोधा केला आहे. खरं तर कर्नाटक विधानसभेच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या चित्रपटाचा संदर्भ देत काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी उभा असल्याचा आरोप करत राजकीय सौदेबाजी करत असल्याचेही ते म्हणाले होते. याशिवाय भाजपा नेहमीच दहशतवादाविरोधात कठोर पाऊले उचलत असल्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखतं, असेही मोदी म्हणाले.

 

- Advertisment -