खुशखबर: शेतकऱ्यांच्या खात्यात १८ दिवसांनी ४ हजार रुपये होणार क्रेडिट, वाचा कारण

PM Kisan Samman Nidhi 4000 rupees will be credited in farmers account after 18 days
खुशखबर: शेतकऱ्यांच्या खात्यात १८ दिवसांनी ४ हजार रुपये होणार क्रेडिट, वाचा कारण

पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनाच्या लाभार्थ्यांना पुढील महिन्यात १५ डिसेंबरपासून २५ डिसेंबरपर्यंत १० हप्ता ट्रान्सफर येऊ शकतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षी २५ डिसेंबर २०२०ला शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर केले होते. अशात तुमच्या खात्यामध्ये अशी चुक असेल तर तात्काळ दुरुस्त करा.

पीएम किसान योजने अंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करते. जर तुम्ही देखील शेतकरी आहात आणि या योजनेचा फायदा घेऊ शकत नसला, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा पीएम किसान सम्मान निधीमध्ये तुमचे नाव रजिस्टर करू शकता.

या शेतकऱ्यांना मिळेल ४ हजार रुपये

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ९ हप्ता मिळाला नाही, तर त्या शेतकऱ्यांना एकत्र दोन हप्त्यांचे पैसे येतील. म्हणजेच ४ हजार रुपये ट्रान्सफर सरकारकडून केले जातील. पण ही सुविधा त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी ३० सप्टेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल. दरम्यान पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे डबल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही चुकू टाळा

शेतकऱ्यांना आपले नाव इंग्रजीत लिहिणे गरजेचे आहे. जर तुम्ही हिंदीत नाव लिहिले असेल तर त्यात सुधारणा करा.

अर्ज करताना अकाउंटमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये चुक करू नका.

तसेच बँकचा IFSC कोड लिहिण्यात देखील चुक करू नका.

शिवाय बँकेचे खाते देताना कोणतीही चुक करू नका.

तुमचा पत्ता नीट तपासा. जेणेकरून गावाचे स्पेलिंग लिहिण्यात चूक होणार नाही.

या चुका झाल्यातर तुमच्या खात्यामध्ये २ हजार रुपये येऊ शकणार नाहीत.


हेही वाचा – भारताचा गहू थेट अफगाणिस्तानात व्हाया पाकिस्तान, इमरान खान सरकारची परवानगी