घरदेश-विदेशPM Kisan निधी योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात...

PM Kisan निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Subscribe

किसान जनधन योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान सन्मान योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. आता ही तारीख निश्चित झाली आहे. पण ही रक्कम खात्यामध्ये जमा होण्यासाठी लाभार्थ्यांना पुढील वर्षाची वाट पाहावी लगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विशेष दिवशी शेतकऱ्यांची संवाद साधणार असून एक महत्वपूर्ण संदेश देणार आहे.(PM Kisan Samman Nidhi Yojana)

1 जानेवारी 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातू संवाद साधणार आहे. आणि याच दिवशी किसान योजनेचा 10 वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार शेतकऱ्यांना ही विशेष भेट देण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

दरम्यान , 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता येत्या 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांना 10 वा हफ्ता मिळणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11.17 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली आहे. ही रक्कम तीन हप्त्यामध्ये खात्यामध्ये जमा केली जाते.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम pmkisan.gov या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटच्या होम पेजवर फार्मर्स कॉर्नर असं उजव्या बाजूल लिहण्यात आलं आहे या ऑप्शनवर क्लिक करा. या सूचीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही समोर दिसणाऱ्या पर्यायांवर माहिती भरून सर्च करुन तपासू शकतात.

- Advertisement -

हे हि वाचा – ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा भरावा लागेल दंड

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -