घरदेश-विदेशPM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार रुपये, आजच...

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार रुपये, आजच करा रजिस्ट्रेशन

Subscribe

तसेच पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान नीधी योजना २०१९ पासून लागू करण्यात आली आहे.

देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri kisan sanman yojana)योजनेची सुरुवात केली असून या योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये तिनवेळा 6 हजार रुपये रक्कम जमा करण्यात येते. जर तुम्ही सुद्धा पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहात मात्र या योजनेचा नववा हफ्ता अद्याप तुम्हाला मिळाला नाहिये तर तुम्ही एकत्र चार हजार रुपये रकमेचा लाभ घेऊ शकता. तसेच माहितीनूसार केंद्र सरकारद्वारे मिळणाऱ्या या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  योजने अंतर्गत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या 4 हजार रुपयांचा कशा प्रकारे लाभ घेऊ शकता हे जाणून घेऊयात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अद्याप नोंदणी न केलेले शेतकरी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करू शकतो. शेतकऱ्याचा अर्ज मान्य झाल्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दोन हजार रुपये खात्यात येतील. तेसच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये 2 हजार रुपये जमा करण्यात येतील.

- Advertisement -
महत्वाची कागदपत्र-
  • पात्र शेतकऱ्याकडे बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच केंद्र डीबीट अंतर्गत रक्कम अकांऊटमध्ये ट्रांन्सफर करण्यात येते.
  • बँक अकाऊंट नंबर आधार कार्डशी लिंक करणे.
  • आधार कार्ड शिवाय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही शेतकऱ्याकडे त्याचे ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
असे करा रजिस्ट्रेशन-

प्रंधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करु शकतात. pmkisan.gov या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला क्लिक केल्यानंतर कोपऱ्यात फर्मर कॉर्नरमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिकक करा. यानंतर एक फॉर्म ओपन होईल यामध्ये सर्व माहिती भरुन तुम्ही फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करु शकता.

शेतकऱ्याच्या खात्याम रक्कम जमा न झाल्यास पुढील नंबरवर संपर्क साधू शकता 011-23382401 किंवा  18001155266 , 155261 , 0120-6025109 तसेच [email protected] या मेल आयडीवर खात्यमाध्ये न आलेल्या रक्कम संबधीत माहिती लिहून पत्र पाठवू शकता.

- Advertisement -

पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान नीधी योजना २०१९ पासून लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार म्हणजे एकूण सहा हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. पीएम किसान सन्मान योजनेत काही नियम व अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. व या नियमावलीत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यालाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच. सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.


हे हि वाचा –  पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -