घरदेश-विदेशPM Kisan Yojna : खोट्या कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर येणार संक्रांत

PM Kisan Yojna : खोट्या कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर येणार संक्रांत

Subscribe

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना सन्मानजनक जीवन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. यापैकी पीएम किसान योजना (PM Kisan Yojna) एक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा खोट्या कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आता रक्कम परत करावी लागणार आहे. याशिवाय त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.

देशभरातील करोडो शेतकऱ्यांना सतत बदलणारे वातावरण आणि अवकाळी पाऊस याचा सामना करावा लागत असल्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य खराब होऊ नये आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा यासाठी केंद्राकडून पीएम किसान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना सरकार दरवर्षी 2 हजार रुपये वर्षातून तीनदा म्हणजेच 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु दरवर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांसाठी काही शेतकरी शासनाकडे चुकीची कागदपत्रे किंवा जमीन दाखवून या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. यातून असे निर्देशनास आले की, यापैकी काही लोक या योजनेसाठी पात्र नसतानासुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. भारत सरकारने आत्तापर्यंत एकूण 13 हप्त्यांचे पैसे हस्तांतरित केले आहेत.

- Advertisement -

फसवणूक केली तर होणार कारवाई
चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा लोकांना आता सावध राहण्याची गरज आहे.  त्यामुळे जर तुम्हीही चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला उशिरा का होईना पैसे परत करावे लागतील. जर असे नाही केले तर या योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई होणार आहे.

रिफंडचा पर्याय दिसला तर पैसे परत करावे लागणार
पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे, त्यामुळे एक यादीत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत तुमचे नाव आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ‘फॉर्मर कॉर्नर’चा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा आणि परतावा पर्यायावर जा. यावेळी तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक नंबर प्रविष्ट करावा लागेल. नंबर प्रविष्ट केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर चमकलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. यानंतर ‘डेटा मिळवा’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर ‘तुम्ही कोणत्याही परताव्याच्या रकमेसाठी पात्र नाही’ असा संदेश दिसला तर तुम्ही सुरक्षित आहात. याचा अर्थ तुम्हाला पैसे परत करावे लागणार नाहीत. पण जर तुम्हाला रिफंडचा पर्याय दिसला तर तुम्हाला पैसे परत करावे लागणार आहेत.

- Advertisement -

पीएम किसानचा 14 वा हप्ता कधी?
केंद्र सरकारकडून लवकरच पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. मात्र, याबाबत केंद्राकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -