Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश लडाखमधील चीनच्या घुसखोरीविषयी पंतप्रधान खोटे बोलतायत; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

लडाखमधील चीनच्या घुसखोरीविषयी पंतप्रधान खोटे बोलतायत; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

Subscribe

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून पुन्हा केंद्र सरकारला घेरले आहे.

नवी दिल्ली : मागील आठवड्यात लडाख दौऱ्यावर असलेल्या खासदार राहुल गांधी यांनी भारतीय सीमेत चीन घुसखोरी करीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर चीनकडून एक वादग्रस्त नकाशा पुढे आला होता. त्या नकाशावर देशात राजकारण पेटलेले असताना पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी त्याच विषयावर मोदींना घेरले असून, चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली नाही, एक इंचही जमीन देणार नाही असे म्हणणारे पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे वक्तव्य पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केले आहे.(PM lies about China’s incursion in Ladakh; Rahul Gandhi criticized Modi again)

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून पुन्हा केंद्र सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाख प्रकरणात खोटे बोलत आहेत. अलीकडेच चीनने एक वादग्रस्त नकाशा जारी केला होता, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राचाही उल्लेख करण्यात आला होता. भारत सरकारने चीनचा हा नकाशा नाकारला जरी असला तरी याबाबत खरी माहिती मोदी का पुढे येऊ देत नाही असाही सवाल त्यांनी यानिमित्ताने केला आहे.

पंतप्रधानांनी पुढे येऊन बोलले पाहीजे

- Advertisement -

कर्नाटक दौऱ्यावर असलेले खासदार राहुल गांधी म्हणाले की, लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मात्र ते खरे नाही. मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे की, संपूर्ण लडाख चीनने आपल्या ताब्यात घेतला आहे हे तेथील नागरिकांनाही माहिती आहे. नकाशाची ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यांनी जमीन हिसकावून घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काही बोलायला हवे असे म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले आहे.

हेही वाचा : आदित्य-L1 प्रक्षेपणासाठी सज्ज; इस्रोने ट्वीट करत फोटो केले शेअर

कर्नाटकातील महिलांसाठी सर्वात मोठी योजना

- Advertisement -

कर्नाटकातील काँग्रेस सरकार गृहलक्ष्मी योजना सुरू करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, कर्नाटकचे काँग्रेस सरकार अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महिलांसाठी जगातील सर्वात मोठी कल्याणकारी योजना गृहलक्ष्मी योजना सुरू करणार आहे.

हेही वाचा : CBIकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ‘या’ प्रकरणी मिळाला दिलासा

चीनच्या त्या वादग्रस्त नकाशाचा विरोध

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची, चीनच्या तथाकथित मानक नकाशाच्या 2023 आवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर म्हणाले की, आम्ही आज चीनच्या तथाकथित मानक नकाशाच्या 2023 च्या आवृत्तीवर राजनयिक माध्यमांद्वारे तीव्र निषेध नोंदविला आहे. पुढे ते म्हणाले की, आम्ही हे दावे फेटाळतो ज्यांना कोणताही आधार नाही. चीनच्या अशा पावलांमुळे सीमाप्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल.

- Advertisment -