घरदेश-विदेशPM Modi : ‘मन की बात’मध्ये येणार आमीर खान; काय आहे कारण?

PM Modi : ‘मन की बात’मध्ये येणार आमीर खान; काय आहे कारण?

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून महिन्याच्या शेवटी नागरिकांसोबत संवाद साधतात. या कार्यक्रमाचे नुकतेच 100 भाग पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने नवी दिल्ली येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावली होती. यावेळी आमीर खान (aamir khan) याने ‘मन की बात’ कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिकांसोबत संवाद साधतात. या कार्यक्रमात मोदी नागरिकांसोबत अनेक महत्त्वाच्या योजना, नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा उल्लेख करताना दिसतात. नुकतेच या रेडिओ कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये ‘मन की बात @100’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेते आणि खेळाडू, पत्रकार, रेडिओ जॉकी आणि व्यावसायिक क्षेत्रातील 100 लोकांनी लोकांनी सहभाग नोंदवला होता. हा भाग येत्या 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे.

- Advertisement -

राजधानी दिल्लीत झालेल्या नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ‘मन की बात’च्या 100व्या भागानिमित्त एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात आमीर खान, रवीना टंडन सोबत किरण बेदी, दीपा मलिक, संगीतकार रिकी केज यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी आमिर खान याने पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला ऐतिहासिक उपक्रम असल्याचे वर्णन करत कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

- Advertisement -

आमीर खानने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘मन की बात’ हा कार्यक्रम संवादाचा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते. कल्पना सांगितल्या जातात, सूचना दिल्या जातात, नेतृत्व केले जाते. या कार्यक्रमातून संवाद साधताना नागरिकांना सांगितले जाते की, आपला देश कोणत्या दिशेने जात आहे, भविष्याबद्दलची दृष्टी काय आहे आणि तुम्ही त्याला कसे समर्थन देऊ इच्छिता. असे महत्त्वाचे संभाषण ‘मन की बात’ या कार्यक्रमात होतात.

पंतप्रधान आपल्या मनातील गोष्टी बोलतात?
रेडिओ कार्यक्रमात मोदी फक्त आपल्या मनातील गोष्टी बोलतात का?असा प्रश्न आमीरला विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, “मला वाटते की त्यांना विशेष अधिकार आहेत की, ते हा कार्यक्रम करत आहेत. लोकांना काय बोलायचे हे ऐकण्याची त्यांची पद्धत आहे. देशभरातील लोकांशी ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडले जातात. त्यामुळे मला वाटते की, हा एक अत्यंत आवश्यक उपक्रम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -