घरदेश-विदेशAssembly Election 2021: तामिळनाडूत मोदी दाखल; मदुरईच्या मीनाक्षी देवीची पूजा करून प्रचारास...

Assembly Election 2021: तामिळनाडूत मोदी दाखल; मदुरईच्या मीनाक्षी देवीची पूजा करून प्रचारास सुरूवात!

Subscribe

पंधप्रधान नरेंद्र मोजी पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणूक प्रचारानंतर आता त्यांनी आपला मोर्चा दक्षिण भारताकडे वळवला आहे. आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमध्ये ४ निवडणूक प्रचार रॅलीमध्ये मतदारांना संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूसह केरळ या राज्यात निवडणूक प्रचार करणार आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रॅलीत जनतेला संबोधित करणार आहे. दरम्यान नरेंद्र मोदी गुरूवारीच संध्याकाळी तामिळनाडूत दाखल झाले आहेत. तामिळनाडूत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदुराईच्या मिनाक्षी देवीची पूजा-आर्चना केली आणि दर्शन घेतले. यावेळी नरेंद्र मोदी पारंपारिक वेशभूषेत दिसले.

- Advertisement -

आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मदुराई येथून निवडणूक सभेत सहभागी होऊन प्रचार मोहीमेचा श्रीगणेशा करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.के पलानीस्वामींसह इतर नेते मंडळी देखील उपस्थितीत राहणार आहे. मदुराई येथे जनतेस संबोधित केल्यानंतर ते केरळ राज्याच्या दिशेने प्रवास करणार असून पथानामथिट्टामध्ये निवडणूक सभा घेणार आहेत. याव्यतिरिक्त संध्याकाळी ४ वाजता मोदी कन्याकुमारी येथे देखील प्रचारसभेत सहभागी होऊन जनतेला संबोधित करतील. यानंतर पुन्हा मोदी केरळला जाणार असून संध्याकाळी ६ वाजता तिरूअनंतपुरममध्ये देखील एका जनसभेला संबोधित करणार आहेत.

बघा व्हिडिओ

- Advertisement -

तामिळनाडू आणि केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी पंतप्रधान तामिळनाडू ते केरळ दरम्यान दोनदा या दाखल होणार आहेत. मोदी यांनी गुरुवारी सकाळी ८.३० वाजता दिल्लीहून प्रवास सुरू केला असून ३६ तासांच्या प्रवासात पंतप्रधान मोदी चार राज्यांत सात प्रचाररॅलीत सहभागी होणार आहे. गुरुवारी तीन प्रचार सभेत मोदींनी हजेरी लावली असून आज शुक्रवारी मोदींच्या सात रॅली काढण्यात येणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी ३६ तासांत ५००० किमीपेक्षा अधिक प्रवास करणार असून ते चार राज्यांत प्रचार करणार असल्याची माहिती मिळतेय.


Bengal Election 2021: मिथुन चक्रवर्तींचा रस्त्यावरच ‘डिस्को डान्स’!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -