घरदेश-विदेशमोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल - संजय राऊत

मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत

Subscribe

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत असून आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं.

- Advertisement -

शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची सोमवारी भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे यांची भेट झाली, असं राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -