घरताज्या घडामोडीवाजपेयी जयंती : राष्ट्रपती, पंतप्रधानांचे अटलजींना अभिवादन

वाजपेयी जयंती : राष्ट्रपती, पंतप्रधानांचे अटलजींना अभिवादन

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या 'सदैव अटल' या स्मृतीस्थळावर विविध पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्त्वाने प्रगती साधणारे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे वाजपेयींना अभिवादन केले. त्यांनी म्हटले, आहे की, देशवासियांच्या हृदयात स्थान असलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम.

- Advertisement -

पंतप्रधानांचे हस्ते वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील प्रधानमंत्री लोक भवन येथे उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भव्य पुतळ्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.


हेही वाचा – अटल बिहारी वाजपेयी जयंती; कवी मनाचा राजकारणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -