घरAssembly Battle 2022PM Narendra Modi in Hardoi: दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे काही राजकीय पक्ष, पीएम...

PM Narendra Modi in Hardoi: दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे काही राजकीय पक्ष, पीएम मोदींचा विरोधी पक्षांवर निशाणा

Subscribe

उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत यूपीमध्ये ४६ टक्क्यांच्यावर मतदान झालं आहे. परंतु यूपी विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला तीन दिवस बाकी आहेत. मात्र, मतदानाच्या तीन दिवस आधी हरदोई येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सीएसएन कॉलेजच्या मैदानातून जनतेला संबोधित केलं.

अहमदाबाद स्फोटातील दशतवाद्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मी हे प्रकरण देशासमोर मांडत आहे. कारण अशा दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे काही राजकीय पक्ष आहेत. या लोकांनी खुर्चीच्या स्वार्थासाठी देश पणाला लावला, असा हल्लाबोल पीएम मोदींनी विरोधी पक्षांवर केला आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोटचा उल्लेख करत अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवर हल्लाबोल केला आहे. ज्या पक्षाचं चिन्ह सायकल आहे. त्यावर अहमदाबादमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मला हेच समजत नाहीये की, दहशतवादी बॉम्बस्फोट हल्ले घडवताना सायकलचा वापर का करतात, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

- Advertisement -

जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट हल्ले घडवून आणले होते. त्या दिवसाला मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्याच दिवशी मी संकल्प केला की, माझं सरकार या दहशतवाद्यांना पातळातून सुद्धा शोधून काढील, असं म्हणत मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

हरदोईमध्ये लोकांनी होळी आतापासूनच होळी खेळण्यास सुरूवात केली आहे. कारण पहिली होळी भाजपच्या विजयाची होळी असणार आहे. कारण जेव्हा दहशतवादी हल्ला होतो किंवा वाढतो. तेव्हा सर्वाधिक फटका गरीब, मध्यमवर्तीयांना सहन करावा लागतो. हे आपणा सर्वांना माहिती आहे. जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा जनजीवन विस्कळीत होते. तसेच पर्यटन देखील ठप्प होते. मुंबई, लुधियाना, गुवाहाटी, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, आगरतळा, इंफाळा अशा अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट हल्ले घडवण्यात आले. त्या काळात निष्पाप लोकांचा बळी गेला होता, असं मोदी म्हणाले.


हेही वाचा : Ranji Trophy 2022: अंडर-१९च्या कॅप्टनचं दुसरं शतक, ८८ वर्षांमध्ये रेकॉर्ड करणारा ठरला तिसरा खेळाडू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -