Homeदेश-विदेशPM Modi : 'भानुमति का कुनबा...', आघाडीचे अलायनमेंट बिघडले! मोदींचा 'इंडिया'वर हल्लाबोल

PM Modi : ‘भानुमति का कुनबा…’, आघाडीचे अलायनमेंट बिघडले! मोदींचा ‘इंडिया’वर हल्लाबोल

Subscribe

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसचे संपूर्ण लक्ष एका कुटुंबावर आहे. त्यापलीकडे ते काही विचार करू शकत नाहीत. आपल्याच राज्यात एकमेकांवर विश्वास नसेल तर हे लोक देशावर कसा विश्वास ठेवणार असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाच्या ताकदीवर आणि जनतेच्या शक्तीवर आमचा विश्वास आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विखुरलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या संथ गतीची तुलनाच करता येत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी ‘भानुमतीचा कुनबा’ जोडले पण नंतर एकला चलो रे’ करायला सुरुवात केली. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. (PM Modi Bhanumati Ka Kunba the alliance of the alliance is broken Modis uproar on India)

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसचे संपूर्ण लक्ष एका कुटुंबावर आहे. त्यापलीकडे ते काही विचार करू शकत नाहीत. आपल्याच राज्यात एकमेकांवर विश्वास नसेल तर हे लोक देशावर कसा विश्वास ठेवणार असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाच्या ताकदीवर आणि जनतेच्या शक्तीवर आमचा विश्वास आहे. पंतप्रधान मोदींनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसचा देशाच्या क्षमतेवर कधीच विश्वास नव्हता. ते स्वतःला राज्यकर्ते मानत आणि जनतेला तुच्छतेने पाहत होते.

हेही वाचा : Maharashtra Politics : अजितदादांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून…; आव्हाडांकडून प्रतिआव्हान

पंडित जवाहरलाल नेहरू देशातील जनतेला ‘आळशी’ मानत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. नेहरूंच्या एका कथित भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले, “ते म्हणायचे की, भारतातील लोकांना सामान्यतः कठोर परिश्रम करण्याची सवय नाही. रशिया, चीन किंवा इतर देशांतील लोक जेवढे काम करतात तेवढे आम्ही करत नाही. त्यांनी दावा केला. नेहरूंनी हे लाल किल्ल्यावरून सांगितले होते. नेहरूंनी भारतीयांना कमी बुद्धी आहे असे मानले. त्यांची विचारसरणी नेहरूंपेक्षा वेगळी नसल्याचा आरोप त्यांनी इंदिरा गांधींवर केला. पंतप्रधानांनी इंदिरा गांधींच्या कथित भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावरही हल्ला केला.

हेही वाचा : Kiran Mane: मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत किरण माने म्हणाले, भाषण करताना एक चिठ्ठी आली अन्…

घराणेशाहीचा देशाला फटका

‘घराणेशाही’चा फटका देशासह काँग्रेसला बसला आहे, ‘आमचे मल्लिकार्जुन खर्गे या सभागृहातून त्या सभागृहात गेले आणि गुलाम नबी आझाद पक्षातूनच स्थलांतरित झाले, हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले आहेत. यानंतर मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले की, ‘पुन्हा तेच ते उत्पादन काँग्रेस बाजारात मांडून दुकान उघडत आहे, परंतु त्यांचे दुकानाला कधीच टाळे लागले आहे, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला.