Homeदेश-विदेशPM Modi : भाजप 370 तर एनडीए 400 पार; पंतप्रधान मोदींनी फुंकलं...

PM Modi : भाजप 370 तर एनडीए 400 पार; पंतप्रधान मोदींनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग

Subscribe

माझा देशातील नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. गरिबाना जर संसाधनं मिळाली तर ते गरिबीचा पराजय करुन दाखवू शकतात. त्यामुळेच मला देशाचा सध्या मूड दिसतोय की, मी कधीच आकड्यात अडकत नाही, परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीला चारशे आणि भाजपला 370 जागांवर यश मिळेल असं वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 पार तर एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं हे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (PM Modi BJP 370 and NDA 400 Prime Minister Modi blew the trumpet of the Lok Sabha)

माझा देशातील नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. गरिबाना जर संसाधनं मिळाली तर ते गरिबीचा पराजय करुन दाखवू शकतात. त्यामुळेच मला देशाचा सध्या मूड दिसतोय की, मी कधीच आकड्यात अडकत नाही, परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीला चारशे आणि भाजपला 370 जागांवर यश मिळेल असं वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Asaduddin Owaisi : “ही तर आम्हाला धमकी…”, गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्याला ओवैसींचे प्रत्युत्तर

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही गरिबांसाठी चार लाखाहून अधिक घरं उपलब्ध करून दिली. जर काँग्रेसच्या वेगानं आम्ही चाललो असतो तर याच कामासाठी शंभर वर्षे लागली असती. त्यासाठी पाच पिढ्या लागल्या असत्या. आम्ही 17 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन दिली. जर काँग्रेसच्या वेगानं गेलो असतो तर 60 वर्षे लागली असती असाही हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विरोधकांवर केला.

हेही वाचा : Shambhuraj Desai : गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप तथ्यहीन- शंभूराज देसाई

इंडिया आघाडीवरही सडकून टीका

देशाच्या आर्थिक विकासावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, इंडिया अलायन्सचं अलायनमेंट बिघडलं आहे. त्यांना आपल्या प्रदेशातच एकमेकांवर विश्वास नसेल तर यांचा देशावर कसा विश्वास असेल? आम्हाला देशाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, लोकांच्या शक्तीवर विश्वास आहे. देशाच्या जनतेची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं यापेक्षा दुसरा आनंद कोणता ? असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसनं ओबीसींसोबत अन्याय केला. नेहमी विचारलं जातं की, संसदेत ओबीसी किती आहेत? त्यांना मी येथे मोठा ओबीसी नेता दिसत नाही का? कर्पूरी ठाकूर यांना नुकताच भारतरत्न जाहीर केला. त्या कर्पूरी ठाकूर यांना काँग्रेसने कधी साथ दिली नाही असाही हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.