घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात, प्रल्हाद मोदींसह चौघे जखमी

पंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात, प्रल्हाद मोदींसह चौघे जखमी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. ही घटना कर्नाटकातील म्हैसूरमध्ये घडली आहे. या घटनेत प्रल्हाद मोदींसह कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि सूनही होते. मुलगा आणि सून या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही या अपघाताची माहिती कळवली आणि रुग्णालयालाही भेट दिली.

- Advertisement -

हेही वाचा : सरकार शिंदे चालवतायत की फडणवीस हा प्रश्न, सध्या चोरांची सत्ता; प्रकाश आंबेडकरांची खोचक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -