घरदेश-विदेशराणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद निश्चित? मोदींच्या निवासस्थानी दाखल

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद निश्चित? मोदींच्या निवासस्थानी दाखल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. त्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रामधून खासदार नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, राज्यसभेचे खासादर भागवत कराड यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. कारण हे सर्व नेते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातले तीन नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. नारायण राणे, कपिल पाटील आणि भागवत कराड हे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विस्तारात यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. भाजपचे संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्या उपस्थितीत ७, लोक कल्याण मार्ग वर महत्वपूर्ण चर्चा सुरु आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित आहेत.

- Advertisement -

राणेंना संधी मिळाली तर भाजपला काय फायदा?

नारायण राणे हे आक्रमक नेते आणि मराठा समाजातील चेहरा म्हणून ओळख आहे. आरक्षणाचा मुद्दा राणेंच्या माध्यमातून तापवण्याचा प्रयत्न असू शकतो. तसंच, अलीकडेच शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, नारायण राणे यांचा शिवसेना आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जुना संघर्ष आहे. त्यामुळे राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न आहे.

याशिवाय, कोकणात भाजपची ताकद वाढवण्यास मदत होईल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बुलंद आवाज भाजपला मिळेल. तसंच, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

- Advertisement -

कपिल पाटील यांचा काय फायदा होईल?

खासदार कपिल पाटील २०१४ आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. कपिल पाटील आगरी समाजातून येतात. ओबीसी चेहरा असल्यानं पक्षाला फायदा होईल. कपिल पाटलांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी अडचणीत असताना कपिल पाटलांना पद देणं सूचक कृती आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -