घरदेश-विदेशPM Modi: काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यायोग्यही मानत नव्हती; पंतप्रधानांचा हल्लाबोल

PM Modi: काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यायोग्यही मानत नव्हती; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत उत्तर दिलं. ते म्हणाले की, मी आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी आदरपूर्वक त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. त्या दिवशी मी काही बोलू शकलो नाही, पण खर्गेजींचे विशेष आभार व्यक्त केले. मी खर्गेजींचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि इतका आनंद मला मिळाला, जो लोकसभेत क्वचितच मिळतो. (PM Modi Congress did not give Bharat Ratna to Babasaheb Ambedkar They only have their Prime Minister Narendra Modi s attack)

यावेळी पंतप्रधान मोदींनी खोचक प्रश्न केला ते म्हणाले की, मला नवलं वाटतं की, इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य त्याला कसं मिळालं कसं. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याच्यासोबत राहणारे दोन खास सेनापती तिथे नाहीत आणि त्यामुळे खर्गेंनी याचा पुरेपूर फायदा घेतला. मला वाटतं त्या दिवशी खर्गेंनी सिनेमातलं ते गाणं ऐकलं असेल – ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा? एका गोष्टीमुळे मला आनंद झाला तो म्हणजे त्यांनी एनडीएला 400 जागांसाठी आशीर्वाद दिले.

- Advertisement -

जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेनं बळं दिलं आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. तुमच्यासारखा माणूस सभागृहात आला तर तो शिष्टाचार पाळेल, असे मला वाटले होते, पण तुम्ही लोकांनी दीड ते दोन तास माझा छळ केला, पण मी संयम सोडला नाही.

आज खूप मोठ्या गोष्टी बोलल्या जात आहेत, ऐकून घेण्याची ताकदही आपण गमावली आहे, पण देशासमोर मुद्दा मांडण्यासाठी ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला होता, त्या काँग्रेसला मी नक्कीच सांगेन. ज्या काँग्रेसने लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे एका रात्रीत डझनभर वेळा बरखास्त केली. ज्या काँग्रेसने देशाची राज्यघटना आणि लोकशाहीची प्रतिष्ठा तुरुंगात टाकली. ज्या काँग्रेसने वर्तमानपत्रांना टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला होता. आता तिच काँग्रेस आपल्याला लोकशाहीवर व्याख्यान देत आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसने जाती आणि भाषेच्या नावावर देशाचे विभाजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, ज्या काँग्रेसने आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद-अलिप्ततावाद वाढू दिला, ज्या काँग्रेसने ईशान्येला हिंसाचार आणि मागासलेपणाकडे ढकलले, ती काँग्रेस ज्याने नक्षलवादाला प्रोत्साहन दिले. ज्या काँग्रेसने देशाची जमीन शत्रूंच्या हाती दिली, ज्या काँग्रेसने देशाच्या लष्कराचे आधुनिकीकरण होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसने 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आणली, आम्ही 10 वर्षांत पाचव्या स्थानावर आणली. ते आम्हाला येथे आर्थिक धोरणांवर व्याख्यान देत आहेत. ज्या काँग्रेसने ओबीसींना पूर्ण आरक्षण दिले नाही, सर्वसामान्य गरीब वर्गाला आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नासाठी योग्य मानले नाही. स्वतःच्या कुटुंबाला भारतरत्न देत राहिले. ज्या काँग्रेसने देशातील गल्ल्या, रस्ते, चौक, चौकाचौकात स्वतःच्या कुटुंबाचे नाव दिले आहे, तीच काँग्रेस आम्हाला उपदेश करत आहे, असंही मोदी म्हणाले.

(हेही वाचा: PM Modi On Gandhi : दोन कमांडर नसल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे एवढे बोलले; पंतप्रधान मोदींचा टोला )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -