घरदेश-विदेशशेतकरी आंदोलन : विरोधकांसह पाठिंबा देणाऱ्यांवर मोदींनी केली टीका

शेतकरी आंदोलन : विरोधकांसह पाठिंबा देणाऱ्यांवर मोदींनी केली टीका

Subscribe

आंदोलनांना पाठिंबा दर्शवणार्‍या, सहभाग घेतलेले नेते व राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सडकून टीका

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणार्‍या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणार्‍या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. देशात अशी नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे, असे मोदींनी म्हटले आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

मोदी म्हणाले, श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे कुणाचेही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवे.

- Advertisement -

हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत असतात. नवनव्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे देशाने अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवे. त्यांना स्वतःला नीट उभे राहता येत नाही ते दुसर्‍याच्या आंदोलनात जाऊन बसतात, हीच त्यांची ताकद आहे. हे सर्व आंदोलनजीवी परजीवी असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, अशा शब्दांत मोदींनी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणार्‍यांना सुनावले आहे.

भारतीय लोकशाही ही मानवी संस्था

भारताची लोकशाही ही पाश्चिमात्य संस्था नाही तर एक मानवी संस्था आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका घेणार्‍यांना आणि परदेशी सेलिब्रिटींनी टोला लगावला. भारतीय लोकशाहीवर जे लोक शंका घेतात किंवा भारताच्या या मूलभूत शक्तीवर ज्यांना शंका आहे त्यांना मी विशेष आग्रहाने सांगेन की त्यांनी भारताची लोकशाही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भारताची लोकशाही ही कोणत्याही प्रकारे पाश्चिमात्य संस्था नाही, तर ती एक मानवी संस्था आहे. भारताचा इतिहास लोकशाही संस्थांच्या उदाहरणांनी भरलेला आहे. प्राचीन भारतात ८१ गणराज्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो

- Advertisement -

मूळ मुद्यावर कोणीच बोलत नाही

सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसे आहे. आंदोलकांसोबत काय होत आहे. पण, मूळ मुद्यांवर चर्चा झाली असती, तर चांगले झाले असते. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -