काँग्रेस राजघराणे, त्यांच्यासमोर माझी पात्रता नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आज गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये एका सभेला संबोधित केले, यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे, मोदी म्हणाले की, काँग्रेस म्हणतेय की, मोदींना त्यांची लायकी दाखवली जाईल, हा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहेत, मी सामान्य कुटुंबातील आहे, मी लोकसेवक आहे, मला आधीपासूनचं काही दर्जा मिळालेला नाही. काँग्रेस नेते मला काय काय नाही बोलले, नीच म्हणाले, गटारातील किडा म्हणाले, माझी कोणतीच लायकी नाही म्हणाले… मौत का सौदागर म्हणाले, अरे विकासाच्या मुद्यावर चर्चा करा ना. असे आव्हानही मोदींनी काँग्रेसला दिले आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, एक काळ होता जेव्हा गुजरातमध्ये सायकलही बनवली जात नव्हती. आज गुजरातमध्ये विमाने बनवली जात आहेत. 25 वर्षांच्या सुवर्णकाळासाठी पाच वर्षे खूप महत्त्वाची आहेत. यावर तरुणांचे भवितव्य अवलंबून असेल. तुमचे भविष्य घडवण्याची भूमिका फक्त भाजपच बजावू शकते. असा दावाही त्यांनी केला.

जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकासाची चर्चा व्हायला हवी की नाही? कोणी किती काम केले, यावर चर्चा व्हायला हवी की नाही? पाणी पोहोचले की नाही, वीज पोहोचली की नाही, यावर चर्चा व्हायला हवी की नाही? भाजपचा रेकॉर्ड मजबूत आहे हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही, आणि म्हणतात की, आम्ही मोदींना त्यांचा पात्रता दाखवू देऊ. हा अहंकार आहे भावांनो अहंकार. तुम्हाला माहिती आहे की, ते राजघराणं आहे, मी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, माझी कोणताही पात्रता नव्हती, तुम्हाला माझी स्थिती दाखवण्याची गरज नाही. अरे, मी सेवक आहे, सेवक.., मी तो सेवादार आहे, सेवकाला काही लाईकी असते का? असही मोदी म्हणाले.


इंडोनेशियात भूकंपाचा तीव्र हादरा; ४४ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी