घरताज्या घडामोडीदेशात ऑक्सिजनचे टेंशन मिटणार, १ लाख ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स मदतीला

देशात ऑक्सिजनचे टेंशन मिटणार, १ लाख ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स मदतीला

Subscribe

५०० पीएसए प्लॅंटमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ होणार

देशात ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी आज बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. देशात १ लाख ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची खरेदी करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. या खरेदीसाठी पीएम केअर्स फंडातूनच तरतूद करण्यात आली आहे. पीएम केअर फंडातून ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स आणि पीएस प्लॅन्ट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. सहज वाहतूक करण्यासारखे हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स हे ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. देशात संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) ने विकसित केलेल्या ५०० पीएस ऑक्सिजन प्लॅंटला पीएम केअर्स फंडअंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. कोविड व्यवस्थापनासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ऑक्सिजन पुरवणारी ही उपकरणे लवकरात लवकर खरेदी करून ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठी आहे अशा राज्यांना पुरवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. त्यामुळे ५०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे

पीएम केअर्स फंडा अंतर्गत याआधी मंजूर करण्यात आलेल्या 713 पीएसए ऑक्सिजन प्लॅंट आणि 500 नव्या प्रेशर स्विंग एबझॉरब्शन ( पीएसए) ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स पीएम केअर्स फंडाअंतर्गत मंजुर करण्यात आले आहेत. सहज वाहून नेण्याजोग्या ऑक्सिजन उपकरणांची खरेदी आणि पीएसए प्लॅन्टच्या उभारणीमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्ट ते रुग्णालय यादरम्यान ऑक्सिजन वाहतुकीच्या सध्याच्या आव्हानाची दखल घेतली जाणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -