घरदेश-विदेशPM MODI : निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका; मोदी विरोधकांवर...

PM MODI : निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका; मोदी विरोधकांवर पुन्हा गरजले

Subscribe

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जो देशाच्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, जो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे, विशेषत: समाजातील सर्व गटातील लोक, शहरं आणि खेड्यातील महिला, खेड्यातील आणि शहरांमधील सर्व गटातील तरुण, प्रत्येक शेतकरी या माझ्या देशातील गरीब चार महत्त्वाच्या जाती आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आज सोमवार (4 डिसेंबर) पासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत 3 डिसेंबर रोजी लागलेल्या निवडणूक निकालाचा राग संसदेत काढू नका, असा खोचक सल्लाही विरोधकांना दिला. (PM MODI Dont vent your anger at the election defeat in the convention Modi lashed out at opponents again)

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जो देशाच्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, जो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे, विशेषत: समाजातील सर्व गटातील लोक, शहरं आणि खेड्यातील महिला, खेड्यातील आणि शहरांमधील सर्व गटातील तरुण, प्रत्येक शेतकरी या माझ्या देशातील गरीब चार महत्त्वाच्या जाती आहेत. ज्यांचे सक्षमीकरण त्यांना त्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी ठोस योजना, आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचविण्याची जबाबदारी जो उचलतो त्यांना देशातील जनता पूर्णपणे पाठिंबा देते. जेव्हा शासन पूर्णपणे जनतेला समर्पित असते, तेव्हा अनेक घातक शब्द नष्ट होतात. तुम्ही याला मग काहीही नाव ठेऊ शकता, पण मागील काही वर्षापासून चांगला अनुभव येत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आपण संसदेत आहोत, संसद भवनाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन झाले तेव्हा चार दिवसांचे विशेष अधिवेशन घेतले होते. मात्र, आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भरपूर वेळ मिळणार आहे. तेव्हा प्रत्येक सदस्य आपल्या समस्या, मागण्या मांडू शकतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिवाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी विषद केली.

- Advertisement -

हेही वाचा : PHOTO : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी सिंधुदुर्गात नौदलाची रंगीत तालीम; पहा चित्तथरारक कयावती

मोदींनी टोचले खासदारांचे कान

रविवारी लागलेल्या निवडणूक निकालाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या निकालातून देशाने नकारात्मकता नाकारली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी सहकाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी संसद ही लोकशाहीचे आणि लोकांच्या आकांक्षेचे मंदिर असून, हे विकसित भारताच्या नव्या चैतन्याला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे, तेव्हा सर्व खासदारांना विनंती आहे की, त्यांनी चर्चेसाठी जास्तीत जास्त तयारी करून यावे आणि योग्य त्या सूचना द्याव्यात. कारण जेव्हा एखादा खासदार सूचना करतो तेव्हा त्या सुचनेत त्यांच्या परिसरातील अनुभव असतो. पण जर चर्चा झाली नाही तर देश त्या गोष्टींना मुकतो आणि म्हणूनच पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अभ्यासपूर्ण असे प्रश्न उपस्थित करून त्याचे निराकरण करून घ्यावे. असाही सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील खासदारांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा : PM MODI : विजयाची Hat-Trick लावल्यानंतर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

…ही तर विरोधकांना सुवर्णसंधी

सध्याचे निवडणूक निकाल बघितले तर विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कारण, या अधिवेशनात पराभवातून मार्ग काढण्यासाठी नियोजन करण्याऐवजी ते जर असेच भांडत राहले तर त्यांना एका महिन्यांत 30 पराभवांना सामोरे जावे लागेल. मागील नऊ वर्षापासूनची नकारात्मकता सोडून या सत्रात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेल्यास नऊ वर्षानंतर देश पुन्हा त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघून त्यांना मतदान करू शकेल. तेव्हा विरोधकांनी कारात्मक विचार घेऊन अधिवेशनात सहभागी व्हावे, बाहेर झालेल्या पराभवाचा राग घेऊन अधिवेशनात त्याचा राग काढू नका, असा खोचक सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -