नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखिल कामथ यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा उलगडा केला. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच पॉडकास्ट असून राजकारणाशिवाय त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला. त्यांना विचारलेल्या या प्रश्नाचे त्यांनी थोडक्यात उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये त्यांच्या एका जुन्या छायाचित्राबाबतही प्रतिक्रिया दिली. (PM Modi first podcast answered on Italy PM Giorgia Meloni memes)
हेही वाचा : Local Government Bodies : महायुतीचे संकेत देताना उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…
या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांना निखिल कामथ यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि त्यांच्या व्हायरल मीम्सवर प्रश्न विचारले. यावेळ त्यांना हा प्रश्न थेट न विचारता अप्रत्यक्षपणे मोदींना मिम्सबद्दल विचारले गेले. ‘जर मी थोडेसे विषयांतर केले तर, माझा आवडता पदार्थ पिझ्झा आहे आणि पिझ्झा इटलीचा आहे. लोक म्हणतात की तुम्हाला इंटरनेटवर इटलीबद्दल बरीच माहिती आहे, तुम्हाला याबद्दल काही सांगायचे आहे का?” यावर ते जास्त काही बोलले नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा निखिल कामत यांनी विचारले की, तुम्ही हे मीम्स पाहिले आहेत का? यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी यांचा संदर्भ दिला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘हे सर्व चालूच राहते, मी त्यावर माझा वेळ वाया घालवत नाही.’ असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कार्यालय असो की राजकारण अनेक ठिकाणी आपल्यात वाद असतात. पण त्याचा अर्थ असा नाही की व्यक्तीने गेंड्याच्या कातडीचा असले पाहिजे. सार्वजनिक जीवनात संवेदनशीलता खूप गरजेची आहे. संवेदनशील नसला तर इतरांचे कल्याण करु शकणार नाही. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यावर मी निश्चित केले की, मेहनतमध्ये कमी करणार नाही. मी स्वत:साठी काहीच करणार नाही. मी चुकीचे काही करणार नाही. या गोष्टींना मी जीवनाचा मंत्र केला. मी मानव आहे. देवता नाही, परंतु मी रंग बदलणारा व्यक्ती नाही. तुम्ही कधी चुकीचे केले नाही तर तुमच्यासोबत काही चुकीचे होणार नाही.