नवी दिल्ली : इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांची योजना सुप्रीम कोर्टानं नुकतीच घटनाबाह्य ठरवली. हे रोखे वितरित करण्याचा अधिकार ज्या बँकेला होता त्या स्टेट बँक ऑफ इंडियानं याची माहिती टप्प्याटप्प्यात दिली. निवडणूक आयोगाने हा तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला. या तपशीलांनुसार गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले त्यातील सर्वाधिक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत. त्यावरून विरोधकांनी भाजपावर आणि पर्यायाने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. आता एका मुलाखतीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं आहे. निवडणूक रोख्यांवर ज्यांनी टीका केली, त्यांना याचा पश्चाताप होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा – Maharashtra Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस…राज्यातील या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा
कोणतीही व्यवस्था बिनचूक नसते…
इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणामुळे भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याबाबतच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणामुळं आमच्या सरकारला कोणताही फटका बसणार नाही. कोणतीच व्यवस्था कधीच परफेक्ट नसते, त्यात सुधारणेला कधीही वाव असतो. त्याचबरोबर ज्यांनी या मुद्द्यावरुन थयथयाट केला, ज्यांना आपल्या या कृतीचा अभिमान वाटत होता, त्यांनाच पुढे याचा पश्चात्ताप होईल.
यापूर्वीच्या निवडणुकीचे स्रोत माहित आहेत का?
जे या निवडणूक रोख्यांविरोधात बोलत आहेत, त्यांनी 2014 पूर्वीच्या निवडणुकीसाठी निधीचे स्रोत आणि त्यांचे लाभार्थी कोण होते, याची माहिती कोणतीही यंत्रणा देऊ शकते का, याची विचारणा करावी. इलेक्टोरल बॉण्ड सिस्टीम, आपल्या सरकारमुळेच या बॉण्डद्वारे ज्यांनी पैसे दिले आणि जे राजकीय पक्ष लाभार्थी ठरलेत ते समोर आले आहेत. आज जर याची पावती आपल्याला उपलब्ध असेल तर ते या बॉण्ड्समुळेच. मात्र, कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते त्यात काही उणीवा असू शकतात आणि त्या सुधारल्या जाऊ शकतात.
हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च; किंमत किती? पाहा काय आहे खास…