Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश PM Modi : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे मणिपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

PM Modi : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे मणिपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

Subscribe

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर त्यांनी भारतातील नागरिकांना मार्गदर्शन केले.

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर त्यांनी भारतातील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतातील अनेक गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांकडून विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यांनी यावेळी आपल्या भाषणातूनआत्मनिर्भर भारत, मणिपूर हिंसाचार, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवाशक्ती, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच पंतप्रधानांकडून यावेळी मणिपूरमधील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (PM Modi: From Red Fort, PM Narendra Modi appeals to the citizens of Manipur to maintain peace)

हेही वाचा – आमचे सरकार येताच देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म…, मोदींनी मांडला 9 वर्षांचा लेखाजोखा

- Advertisement -

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून भारतातील उत्तरेत असलेल्या मणिपूर या भागात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराचे पडसाद देशातील अनेक राज्यात दिसून आले. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरून विरोधकांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधानांनी 2 तासांपैकी फक्त 5 मिनिटे भाषण केले. परंतु आज त्यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करताना सुरुवातीलाच मणिपूरमधील हिसांचारावर भाष्य केले.

यावेळी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, मागील काही आठवड्यात उत्तर भारतात विशेषतः मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथल्या महिलांवर अत्याचार झाला आहे. पण देश मणिपूरमधील लोकांच्या सोबत आहे. शांतीनेच समाधानाचा मार्ग निघेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्यात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मणिपूरमधील नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. देशात अनेक ठिकाणी आज नैसर्गिक संकट आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात सर्व भारतीयांचे मोठे योगदान आहे. गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आहे. या घटनेचा प्रभाव पुढील 1 हजार वर्षे असणार आहे. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे आता आपल्याला थांबायचे नाही. आता द्विधा स्थितीत राहायचे नाही. पुढील हजार वर्षाची दिशा निश्चित होणार आहे. तंत्रज्ञानात भारतीयांचा जगात डंका आहे. देश प्रगतीच्या मर्गावर पुढे जात आहे. देशात आज स्वातंत्र्याचा जल्लोष आहे, असे पंतप्रधानांकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, यावेळी त्यांनी देशातील युवाशक्तीचे विशेष कौतुक केले. आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. देशातील युवाशक्तीच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाही, दुविधेमध्ये जगायच नाही, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -