घरCORONA UPDATEकुणालाही नोकरीवरून काढू नका; वाचा मोदींनी सांगितलेल्या ७ सूचना

कुणालाही नोकरीवरून काढू नका; वाचा मोदींनी सांगितलेल्या ७ सूचना

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या महत्त्वाच्या सात सूचना खालीलप्रमाणे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलेल्या भाषणात याची घोषणा केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याचा कालावधी आज, १४ एप्रिल रोजी संपला असून आता पुन्हा २० दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे.

दरम्यान, ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. तसेच त्यांनी जर आपल्या राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणली तर अशा राज्यांचे २० एप्रिलपर्यंत मूल्यांकन करून तेथील नियम शिथील केले जाऊ शकतील, असेही मोदी यावेळी म्हणाले. त्यासंबंधी सरकार उद्या नवीन नियमावली जारी करणार असल्याचे मोदींनी सांगितले. आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना सात महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहेत.

- Advertisement -

१. जुने आजार असलेल्या वृद्धांची काळजी घ्या.

२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, प्रत्येकाने मास्क वापरा.

- Advertisement -

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सूचना पाळा.

४. आरोग्यसेतू app download करा.

५. गरीब कुटुंबांची काळजी घ्या.

६. कोणालाही नोकरीवरून काढू नका.

७. कोरोनायोद्धे – डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांचा गौरव करा.

 


हेही वाचा – CoronaVirus: देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन; पंतप्रधानांची मोठी घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -