घरदेश-विदेशPM Modi : 'SPG ने नकार दिल्यानंतरही गेलो होतो पाकिस्तानात'; मोदींनी सांगितला किस्सा

PM Modi : ‘SPG ने नकार दिल्यानंतरही गेलो होतो पाकिस्तानात’; मोदींनी सांगितला किस्सा

Subscribe

पंतप्रधान मोदींनी आज दुपारी 2.30 वाजता फोन आल्यानंतर खासदारांना अनौपचारिक भोजनाचे निमंत्रण दिले. 'चला, तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल', असे पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत जेवण केले. यावेळी भाजप खासदार हिना गावित,एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि बीजेडी खासदार सस्मित पात्रा आणि एन.के प्रेमचंद्रन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी जेवण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या विवाहला जाऊ नका, असा सल्ला एसपीजीने दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आज दुपारी 2.30 वाजता फोन आल्यानंतर खासदारांना अनौपचारिक भोजनाचे निमंत्रण दिले. ‘चला, तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल’, असे पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले. पंतप्रधान मोदी आणि खासदारांनी कॅन्टीनमध्ये शाकाहारी जेवण आणि नाचणीचे लाडू खाल्ले. भोजनादरम्यान एका खासदाराने पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानमध्ये जावून नवाझ शरीफ यांच्या मुलीचा विवाह सोहळा हजेरी लावली. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, मी दुपारी 2 वाजेपर्यंत संसदेत होते. त्यानंतर मोदींना अफगाणिस्तानला रवाना झाला होता. अफगाणिस्तानातून परत येताना मी पाकिस्ताना जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी एसपीजीने मला पाकिस्तानात तसे जाण्यास नकार दिला होता. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, एसपीजीच्या नकारानंतरही त्यांनी नवाझ शरीफ यांना फोन केला आणि विचारले की ते त्यांना स्वीकारतील का? त्यानंतर पंतप्रधान पाकिस्तानात गेले.”

- Advertisement -

हेही वाचा – Ravindra Jadeja : क्रिकेटर रवींद्र जडेजा गृहकलह; वडिलांनी केले सूनेवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर

खासदारांनी मोदींना विचारले अनेक प्रश्न

खासदारांसोबत जेवण करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा प्रवास, अनुभव आणि योगाबद्दल अनौपचारिक संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी जेवण्यास काय आवडते, त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मला ‘खिचडी’ खाण्यास आवडते. पंतप्रधानांनी एका खासदाराला सांगितले की, कधी कधी माझा प्रवास एवढा असतो की, मला कळत नाही की, एक दिवसही माझी झोप झाली की, नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -