भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आज नौदलाच्या ताफ्यात; PM मोदींच्या हस्ते अनावरण

PM Modi Inauguration largest INS Vikrantship ever built in Indias maritime history in Kerala

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आता आणखी भर पडणार आहे. आज भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धानौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केरळच्या कोची येथील कोचीन शिपयार्ड येथे आयएनएस विक्रांतचा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन बोधचिन्हाचेही अनावरण झाले.

भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाईन ब्युरो (WDB) द्वारे डिझाइन केलेले आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या INS विक्रांत हे विमानवाहू जहाज अत्याधुनिक ऑटोमेशन सुविधांसह सुसज्ज आहे. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव भारताच्या पहिल्या विमानवाहू जहाजाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ज्याने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.


आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यामुळे 20 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर असतील. यातील मिग-29 के लढाऊ विमान हवेत, अँटी-सर्फेस आणि जमिनीवर हल्ला करण्याच्या भूमिकेत उड्डाण करू शकते. सोबतचं ते कामोव्ह 31 ऑपरेट करण्यास देखील सक्षम असेल. हे एअर वॉर्निंग हेलिकॉप्टर असून , नुकतेच त्याचा ताफ्यात समावेश करण्यात आला परंतु अद्याप चालू झालेले नाही. याशिवाय MH-60R जे बहु-भूमिका असलेले हेलिकॉप्टरही असून यात स्वदेशी ALH चाही समावेश असणार आहे. ज्याचे वजन सुमारे 45,000 टन आहे . ही भारतीय नौदलाच्या यादीतील निश्चितपणे सर्वात मोठी युद्धनौका आहे.

INS विक्रांतच्या बोर्डवर स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात बसवण्यात आली आहे. यामध्ये देशातील प्रमुख औद्योगिक घराण्यांसह 100 हून अधिक एमएसएमईचा समावेश आहे. विक्रांतच्या नियुक्तीमुळे भारताकडे दोन कार्यरत विमानवाहू जहाजे असतील, ज्यामुळे देशाचे सागरी सीमा अधिक दृढ होतील. भारतीय नौदलाच्या मते, 262-मीटर लांबीच्या वाहकाचे वजन सुमारे 45,000 टन आहे जे त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा खूप मोठे आणि अधिक प्रगत आहे.


कर्नाटकात बलात्काराच्या आरोपाखाली मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक