QUAD Summit 2022 : जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित, विचारला ‘हा’ प्रश्न

मोदींनी जपानच्या तरुणांना आयुष्यात एकदा तरी भारतात येण्याचे आवाहन

pm modi arrives in japan to attend QUAD Summit 2022 japanese boy speaks in hindi language to him
QUAD Summit 2022 : "मला लोण्यावर नव्हे तर दगडावर रेघ ओढायला आवडते'', पंतप्रधान मोदींचं जपान दौऱ्यात दमदार भाषण

क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जपानच्या टोकियोमध्ये (PM Narendra Modi in Japan) दाखल झाले. यावेळी मोदींच्या आगमनाने जपानमधील अनिवासी भारतीयांमध्ये मोठी देशभक्ती दिसून आली. यावेळी मोदी टोकियोमध्ये दाखल होताच मोदींचे भारतीय समुदायाचे जंगी स्वागत केले. (PM Modi in Tokyo) यावेळी भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ठरवलेले ध्येय महत्त्वाकांक्षी होते, परंतु त्यांना मिळालेले शिक्षण आणि मूल्ये त्यांना धैर्याने आव्हानांचा सामना करण्यास शिकवतात. टोकिओच्या दोन दिवशीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भारतीय समुदायाचा संबोधित करताना मोदी (Pm Modi) म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारत पुढील 25 वर्षांच्या योजनेवर काम करत आहे.

जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित


यावेळी एका हॉटेलमधील मुलाकडून अस्खलित हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी खूप अचंबित झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टोकिओमध्ये मोदींच्या स्वागतासाठी अनेक मुलं पोहचली होती. या काही मुलं हातात पेंटिंग घेऊन उभी होती. यावेळी मोदींनी अनेक मुलांच्या पेटिंग्सवर ऑटोग्राफ दिला. यात रित्सुकी कोबायासी नावाच्या एका जपानी मुलाने चक्क मोदींसोबत हिंदीत संवाद साधला, यावेळी मोदी म्हणाले की, अरे व्वा! तू हिंदी कुठून शिकला, फार छान समजतं. यावर रित्सुकी म्हणाला की, मी पीएम मोदींचा मेसेज वाचला, त्याचा खूप आनंद झाला. यावेळी मोदींची स्वाक्षरी मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला होता.

मोदींनी जपानच्या तरुणांना आयुष्यात एकदा भारतात येण्याचे केले आवाहन

मोदी यावेळी आपल्या भाषणात (Pm Modi) म्हणाले की, “मला मिळालेल्या संस्कारांमुळे, ज्या लोकांनी माझे शिल्प केले आहे, त्यामुळे मला सवय झाली आहे. . मला लोण्यावर रेघा काढण्यात मजा येत नाही, मला दगडांवर रेघा काढण्यात आवड आहे. जपानचा प्रभाव असलेल्या स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना एकदा तरी जपानला जाण्यास सांगितले होते. यावेळी मोदींनी जपानच्या तरुणांना आयुष्यात एकदा तरी भारतात येण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून आपापसात एकोपा वाढेल. पंतप्रधान म्हणाले, ते जेव्हाही जपानमध्ये येतात तेव्हा त्यांना मनापासून प्रेम वाटते. जपानमध्ये असे अनेक भारतीय आहेत जे अनेक दशकांपासून येथे राहतात. ज्या वेळी नवी दिल्ली आणि टोकियो राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत, त्या वेळी अधिक दृढ होत असलेल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमधील आधुनिक भागीदारीचा मजबूत पाया घातला गेला आहे.

हरित क्रांती आणि डिजिटल क्रांतीमधील महत्त्वपूर्ण प्रगती

पंतप्रधानांनी (Narendra Modi) अलीकडच्या काळात भारतातील विविध आर्थिक-सामाजिक प्रगती आणि सुधारणा उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. यात विशेषत: पायाभूत सुविधा, सुशासन, हरित क्रांती आणि डिजिटल क्रांती या क्षेत्रांचा उल्लेख केला. याचे जगभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना काळातील आव्हानांमध्येही लाखो भारतीयांना डिजिटल माध्यमातून थेट फायदा झाला आहे.

आज भारत आपली सभ्यता आणि संस्कृत आणि गमावलेला विश्वास परत मिळवत आहे. जगभरातून येणारा कोणताही भारतीय भारताबद्दल अभिमानाने बोलतो. हा बदल आला आहे. आज जगभरात योगाची चर्चा होत आहे. आज आपल्या मसाल्यांची मागणी वाढत आहे. एवढेच नाही तर आपली खादी पूर्वी फक्त नेत्यांचे कपडे होती, आज ती जागतिक झाली आहे. हे भारताचे बदलते चित्र आहे. आज भारताला त्याच्या भूतकाळाचा जितका अभिमान आहे, तितकाच त्याच्या प्रतिभावान नेतृत्वाचा, विज्ञान आघाडी भविष्याबद्दल आशादायी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर (Modi In Japan) सोमवारी दाखल झाले. ते येथे चार नेत्यांच्या शिखर परिषदेत भाग घेतील. 24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड समिटमध्ये मोदींव्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज सहभागी झाले आहेत. या नेत्यांशी पंतप्रधान द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.


Live Update : क्वाड समूहाची बैठक सुरु, इंडो- पॅसिफिक ते युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा