महासागर आणि आव्हाने अनंत मात्र भारताचे उत्तर ‘विक्रांत’ – पंतप्रधान मोदी

pm modi kochi visit to commission first indigenous aircraft carrier ins vikrant live today

भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयएनएस विक्रांतचा लोकापर्ण सोहळा पार पडला. INS विक्रांतच्या लोकापर्ण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे दाखल झाले होते. यावेळी नौदल दलाच्या जवानांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

आयएनएस विक्रांत राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा प्रमाण आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत ज्या सक्षम, समर्थ आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न पाहिले होते. विक्रांत हे त्याचेच एक जिवंत चित्र आहे, महासागर आणि आव्हाने अनंत असतील मात्र भारताचे उत्तर एकचं विक्रांत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विक्रांतचे अतुलनीय योगदान आहे.

भारताच्या उगवत्या आत्म्याचा आवाज विक्रांत

पीएम मोदी म्हणाले की, आज केरळच्या किनारपट्टीवरील प्रत्येक भारतीय एका नव्या भविष्याचा सूर्योदय पाहत आहे. आयएनएस विक्रांतवर होणारा हा कार्यक्रम जागतिक क्षितिजावरील भारताच्या उगवत्या आत्म्याचा जयजयकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आणि खासही आहे. 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा साक्षात पुरावा आहे. विक्रांत हे भारताच्या आत्मनिर्भर होण्याचे अनोखे प्रतिबिंब आहे. आज भारत जगातील त्या देशांमध्ये सामील झाला आहे, जे स्वदेशी तंत्रज्ञानाने एवढी मोठी विमानवाहू युद्धनौका तयार करतात. आज आयएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाची स्वतःची गुणवत्ता, एक ताकद, स्वतःचा विकास प्रवास आहे. हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी संसाधने आणि स्वदेशी कौशल्यांचे प्रतीक आहे. त्याच्या एअरबेसमध्ये बसवलेले स्टीलही स्वदेशी आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नौदलाला गुलामगिरीतून मिळाले स्वातंत्र्य 

भारतीय नौदलाच्या ध्वजावर आजवर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे. आज 2 सप्टेंबर 2022 या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे, गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. जेव्हा विक्रांत आपल्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही तिथे तैनात असतील. महासागराची अफाट शक्ती, अफाट स्त्री शक्ती, ही नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, ब्रिटिश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्‍यांवर किती कठोर निर्बंध लादले गेले, याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडायचे ठरवले. पण छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर अशी नौदल उभारली, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापाराचा धाक होता.

भारतातील मुलींसाठी आता कोणतेही बंधने राहिलेली नाही

INS विक्रांतच्या नौदलात समावेश करण्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारतीय नौदलाने महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते ते आता हटवले जात आहेत. ज्याप्रमाणे समर्थ लहरींना सीमा नसतात, त्याचप्रमाणे भारतातील मुलींनाही सीमा किंवा बंधने नसणार. असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भूतकाळात इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि हिंदी महासागरातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले. पण, आज हे क्षेत्र आमच्यासाठी देशाचे प्रमुख संरक्षण प्राधान्य आहे. म्हणूनच नौदलासाठी बजेट वाढवण्यापासून त्यांची क्षमता वाढवण्यापर्यंत आम्ही प्रत्येक दिशेने काम करत आहोत. पीएम मोदी म्हणाले, पाण्याच्या एका थेंबा थेंबाने अथांग महासागर बनतो. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाने ‘वोकल फॉर लोकल’ हा मंत्र जगायला सुरुवात केली तर देश स्वावलंबी व्हायला फारसा वेळ लागणार नाही. असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.


गुजरातच्या अरवलीमध्ये पायी जाणाऱ्यांना कारने चिरडले; 6 जण ठार, 7 जखमी