घरताज्या घडामोडीकृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यू-टर्न घेतला; मोदींचा पवारांवर निशाणा

कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यू-टर्न घेतला; मोदींचा पवारांवर निशाणा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांच्यासह काँग्रेसला कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत. मात्र, अचानक यू-टर्न घेतल्याने मी हैराण आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना लगावला. कृषी सुधारणा शरद पवारांनाही हव्या आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी तसं म्हटलं होतं. कृषी सुधारणाच्या पद्धतीमध्ये वादविवाद असू शकतो. पण सुधारणा झाल्या पाहिजेत, हे त्यांचं मत होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, शरद पवार यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही कृषी सुधारणांबाबत मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी अजूनही या सुधारणांना विरोध केला नाही. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आणि सुधारणा करत राहू. कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत असं बोलणारे आज विरोधी पक्ष यू टर्न घेत आहेत, कारण राजकारण मध्ये येत आहे, असा निशाणा पंतप्रधान मोदी यांनी साधला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं विधान वाचलं. ‘आमचा विचार असा आहे की मोठी बाजारपेठ आणण्यात अडथळे आहेत. आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला पिकाची विक्री करण्यास परवानगी द्यावी. मनमोहन सिंग यांनी जे म्हटलं ते मोदींनी करत आहेत, अभिमान बाळगा, असं मोदी म्हणाले.


हेही वाचा – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -