Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश PM Modi : 'मणिपूरवर चर्चा होऊ शकली असती, पण...'; मोदींनी विरोधकांवर केला...

PM Modi : ‘मणिपूरवर चर्चा होऊ शकली असती, पण…’; मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल

Subscribe

PM Modi : मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर आज (10 ऑगस्ट) आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. (PM Modi Manipur could have been discussed but Modi attacked the opposition)

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मणिपूरबाबत गृहमंत्र्यांच्या चर्चेच्या मुद्यावर विरोधकांनी सहमती दर्शविली असती, तर सविस्तर चर्चा होऊ शकली असती. पण विरोधकांनी मणिपूरसंदर्भात बोलल्यावर समजले की, हे लोक खोटे बोलत आहेत, पाप पसरवत आहेत. मणिपूरमधील परिस्थितीवर देशाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत संयमाने आणि राजकारण न करता संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार खुलासा केला. त्यांनी देशातील जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती मोदींनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi : ‘मणिपूरवर चर्चा होऊ शकली असती, पण…’; मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल

मणिपूरमध्ये येत्या काळात शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल

मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये न्यायालयाचा निर्णय आला. हा निर्णय तेथील लोकांच्या बाजूने आणि विरोधात होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे तेथील अनेक कुटुंबांची अडचण झाली होती. महिलांवर गंभीर गुन्हे झाले, जे अक्षम्य होते. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे येत्या काळात मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मणिपूर पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासाने पुढे जाईल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – “5 वर्षं दिली तरीही विरोधकांची तयारी नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

मोदींनी मणिपूरच्या जनतेला केले आवाहान

मणिपूरच्या जनतेला आवाहन करताना मोदी म्हणाले की, मला तिथल्या माता, बहिणी आणि मुलींना सांगायचे आहे की, देश तुमच्या पाठीशी आहे. हे घर तुमच्यासोबत आहे. आपण मिळून या आव्हानावर तोडगा काढू आणि शांतता प्रस्थापित करू. यानंतर मणिपूर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल. त्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले जाणार नाहीत, अशी माहितीही नरेंद्र मोदींनी लोकसभेत दिली.

हेही वाचा – विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

मैतेई आणि कुकी समुदायांना संवादात सामील होण्याचे आवाहन

दरम्यान, बुधवारी (9 ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मणिपूरमधील हिंसाचाराची कारणे आणि राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची संपूर्ण माहिती दिली. यानंतर त्यांनी मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना संवाद साधण्याचे आवाहन केले होते. हिंसाचार हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. मी तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही राज्यात शांतता प्रस्थापित करू. या मुद्द्यावर राजकारण करू नये. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना हटवण्याच्या मागणीवर अमित शाह म्हणाले की, जेव्हा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री सहकार्य करत नाहीत, तेव्हा त्यांना बदलले पाहिजे. हे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत, असेही अमित शाहा म्हणाले होते.

- Advertisment -