नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. राज्यसभेतील 56 खासदारांना निरोपावर पंतप्रधान मोदींनी भाषण केले. जेव्हा लोकशाहीवर चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची चर्चा नक्कीच होईल’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निरोपावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा कधी लोशाहीवर चर्चा होईल. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची चर्चा नक्कीच होणार आहे. मी सर्व खासदारांना आवाहन करतो, मग ते या सभागृहात असोत की खालच्या सभागृहात किंवा जे पुन्हा सभागृहात येणार आहेत. त्या सर्वांना सांगतो की, काही दिवसांपूर्वी संसदेत मतदान झाले होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आले होते. एक सदस्यत त्यांच्या कर्तव्यासाठी किती तत्पर आहे, हे प्रेरणादायी उदाहरण आहे. ऐवढेच नाही तर मी बघितले की, मनमोहन सिंग हे त्यांची कर्तव्य बजावताना मागे हटले नाही. ते व्हिलचेअरवर मतदान करण्यासाठी आले, प्रश्न हा नाही की, तर लोकशाही बळकट करण्यासाठी आले होते.”
हेही वाचा – Sharad Pawar : ‘या’ तारखेनंतर शरद पवार पुन्हा पक्षाच्या नवीन नावासाठी…; प्रफुल्ल पटेलांचा दावा
मोदींनी उल्लेख केलेला प्रसंग नेमका कोणात
पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत उल्लेख केलेला प्रसंग हा गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2023 रोजीचा आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनात दिल्लीमध्ये सेवा विधेयक सत्ताधाऱ्यांकडून मंजुरीसाठी मांडले होते. त्या विधेयकावर मतदान करण्यासाठी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आले होते.